2026 मध्ये पहिल्यांदाच सोयाबीन बाजार भावात विक्रमी वाढ! इथे मिळाला पिवळ्या सोन्याला सर्वाधिक भाव

Published on -

Soybean Rate : सोयाबीन उत्पादकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. तुम्ही पण या वर्षी सोयाबीनची लागवड केली असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. सोयाबीन हे राज्यात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक. या पिकाची राज्यभरात लागवड केली जाते. राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ हे दोन विभाग सोयाबीन उत्पादनासाठी विशेष ओळखले जातात.

शासकीय आकडेवारीनुसार देशातील एमपी आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये एकूण सोयाबीन उत्पादनापैकी 85 टक्के उत्पादन होते. महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर राज्यात 40% उत्पादन होते आणि आपले राज्य उत्पादनाच्या बाबतीत देशात दुसऱ्या स्थानी आहे.

यावरून आपल्याला एक अंदाज येतो की राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे अर्थकारण हे सोयाबीन पिकावरच अवलंबून आहे. दरम्यान राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आता आशादायक चित्र तयार होत आहे. राज्यातील मार्केटमध्ये सध्या सोयाबीनच्या दरांबाबत संमिश्र चित्र पाहायला मिळत आहे.

काही प्रमुख बाजारांत दर्जेदार आणि स्वच्छ मालाला समाधानकारक दर मिळत असताना, काही ठिकाणी कमी आवक, दर्जातील फरक आणि स्थानिक मागणी-अपुरवठ्यामुळे दरांवर दबाव जाणवत आहे. दरम्यान आता आपण राज्यातील काही प्रमुख बाजारांमधील सोयाबीनच्या दराबाबतची स्थिती येथे जाणून घेणार आहोत. 

इथं मिळतोय समाधानकारक भाव 

२३ जानेवारी २०२६ रोजीच्या अधिकृत आकडेवारीनुसार राज्यातील सोयाबीनचा सर्वसाधारण बाजारभाव ४,७०० ते ५,३६५ रुपये प्रति क्विंटल या दरम्यान राहिला. अमरावती विभागात यंदा सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर आवक नोंदवली गेली आहे.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत एकूण ५,७८१ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. लोकल प्रतीच्या सोयाबीनला किमान ५,१०० रुपये तर कमाल ५,३०० रुपये दर मिळाला. सर्वसाधारण दर ५,२०० रुपये राहिला. मोठी आवक असूनही दर स्थिर राहिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.

मुर्तीजापूर बाजार समितीत पिवळ्या प्रतीच्या सोयाबीनला चांगली मागणी दिसून आली. येथे १,१०० क्विंटल आवक झाली असून, दर ५,३३० ते ५,४०० रुपये दरम्यान राहिले. सर्वसाधारण दर ५,३६५ रुपये नोंदवण्यात आला, जो आजच्या बाजारातील उच्चांकी दरांपैकी एक मानला जात आहे.

तुळजापूर बाजारातही सोयाबीनला चांगला भाव मिळाला. येथे १६५ क्विंटल आवक झाली असून, दर्जेदार मालामुळे थेट ५,३५० रुपये असा एकसमान दर व्यापाऱ्यांकडून देण्यात आला.

नागपूर आणि चंद्रपूर बाजार समित्यांमध्ये मात्र दरांमध्ये चढ-उतार पाहायला मिळाले. नागपूर बाजारात ६२९ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. येथे किमान दर ४,४०० रुपये तर कमाल दर ५,२५१ रुपये राहिला.

दर्जानुसार दरांमध्ये मोठी तफावत असून सर्वसाधारण दर ५,०३८ रुपये नोंदवण्यात आला. चंद्रपूर बाजारात आवक केवळ ३६ क्विंटल इतकीच राहिली. येथे किमान ४,२०० तर कमाल ४,९४० रुपये भाव मिळाला. सर्वसाधारण दर ४,७०० रुपये असल्याने या भागात दर दबावाखाली असल्याचे स्पष्ट होते.

दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील बाजारांत सोयाबीनचे दर मध्यम पातळीवर राहिले. बुलढाणा बाजारात १२० क्विंटल आवक झाली असून, किमान ५,००० ते कमाल ५,३०० रुपये दर मिळाला. सर्वसाधारण दर ५,१५० रुपये राहिला.

देउळगाव राजा, मंठा, नांदगाव आणि पिंपळगाव (ब) औरंगपूर-भेंडाळी या बाजारांतही पिवळ्या प्रतीच्या सोयाबीनला ५,००० रुपयांच्या आसपास दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe