स्पेशल

Soybean Rate : मकर संक्रांतीच्या पर्वावर ‘या’ बाजारात सोयाबीनला मिळाला सर्वाधिक दर ; वाचा आजचे बाजारभाव

Soybean Rate Maharashtra : सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित केल जाणार एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात शेती केली जाते. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र मध्ये या पिकाचे लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे.

देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनाचा विचार केला तर त्यापैकी जवळपास 40% सोयाबीन उत्पादन हे आपल्या महाराष्ट्रात होते. साहजिकच राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे या पिकावर अर्थकारण अवलंबून असते.

शिवाय गेल्या हंगामात सोयाबीनला चांगला विक्रमी दर मिळाला असल्याने या हंगामात सोयाबीनचा पेरा वाढला आहे. शेतकऱ्यांना यंदा सोयाबीन पिकातून चांगली कमाई होईल अशी आशा होती. मात्र तूर्तास सोयाबीनला चांगला दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे.

जवळपास संपूर्ण हंगामभर सोयाबीनला अपेक्षित असा दर मिळाला नसल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. मध्यंतरी सोयाबीनला 6000 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळत होता तर कमाल बाजारभावाने साडेसहा हजार रुपयांचा पल्ला गाठला होता.

मात्र तदनंतर दरात घसरण झाली. सद्यस्थितीला सोयाबीन साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी दरात विक्री होत आहे. यामुळे सोयाबीन पिकासाठी झालेला उत्पादन खर्च काढणे देखील मुश्किल असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. दरम्यान आज आपण राज्यातील प्रमुख बाजारात सोयाबीनला काय भाव मिळाला आहे याविषयी जाणून घेणार आहोत.

सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समिती :- या मार्केटमध्ये आज 56 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान तसेच 5300 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल आणि सरासरी दर मिळाला आहे.

अजनगाव सुर्जी कृषी उत्पन्न बाजार समिती :- या मार्केटमध्ये आज 76 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 5000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान, 5400 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल आणि 5250 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळत नाही.

आष्टी कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज सोयाबीनची 65 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4700 प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून पाच हजार 310 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला असून 5 हजार 105 रुपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर मिळाला आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts