स्पेशल

Ahilyanagar Politics : शरद पवार गटात फूट ! नगरमध्ये पुन्हा भुकंप ? शरद पवारांना ‘हे’ तीन नेते धोका देतील?

Ahilyanagar Politics : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २०२३ साली मोठी फूट पडली. अजित पवार सुमारे चाळीसहून अधिक आमदारांना घेऊन सत्तेत जावून बसले. शरद पवार बोटावर मोजण्याइतक्या आमदारांना घेऊन विरोधात बसले. त्यानंतर शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत त्यांची जादू दाखवली. मात्र, विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाला सपाटून मार खावा लागला. या दोन्ही गटांतील आमदार फुटण्याच्या चर्चा कायम होत असतात. आताही नगर जिल्ह्यातील चार मोठे नेते पुन्हा शरद पवारांची साथ सोडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एका खासदारासह दोन माजी आमदार अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत. खरंच शरद पवार गटात फूट पडेल का..? कोणते नेते फुटण्याच्या होताहेत चर्चा..? अहिल्यानगर जिल्ह्यात काय आहेत चर्चा..? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न…

अहिल्यानगरचे खा. निलेश लंके यांनी गेल्या आठवड्यात राजकारणात बाँम्ब टाकला. अजित पवार गटाच्या विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष धीरज शर्मा व सोनिया दुहान यांची लंके यांनी पुण्यात भेट घेतली. त्यापूर्वीच सुप्यात झालेल्या राणी लंके यांच्या आभार मेळाव्यात, त्यांनी नव्या चर्चेला जागा दिली होती. आम्हीही रात्रीतून सत्तेत मांडीला मांडी लावून बसू शकतो. महिनाभरात तुम्हाल गूड न्यूज देतो, असे म्हणत खा. निलेश लंके यांनी सगळ्यांनाच बुचकळ्यात टाकले होते. निलेश लंके काय गुड न्यूज देणार, याबाबत त्यांचे समर्थकच काय, पण विरोधकही संभ्रमात पडले होते. लंके यांनी एकाच आठवड्यात बुचकळ्यात टाकणारं स्टेटमेंट आणि अजित पवार गटाच्या नेत्यांची भेट घेतल्यामुळे राज्यभर चर्चा सुरु झाल्या. निलेश लंके हे लवकरच अजित पवार गटात येतील, असे काहींनी पुराव्यासह सांगितले.

खा. लंके यांच्या चर्चा सुरु असतानाच शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील हेही अजित पवारांच्या संपर्कात असल्याच्या बातम्या सुरु झाल्या. विधानसभेच्या विशेष अधिवेशनात या चर्चांना चांगलेच खतपाणी मिळाले. जयंत पाटील हे शरद पवार गटात खूश नसल्यांचे काहींचे म्हणणे आहे. जयंत पाटलांची तेथे घुसमट होत असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात. शरद पवार गटाचे युवा नेते रोहित पवार व जयंत पाटलांत शितयुद्ध सुरु असल्याच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून येत आहेत. आता विधानसभा निवडणुकीतही शरद पवार गटाने सपाटून मार खाल्ला त्यामुळेच जयंत पाटील आता लवकरच अजित पवार गटात येतील, असे काहीजण सांगताहेत. आता जयंत पाटील अजित पवार गटात आले तर त्यांचे भाचे राहुरीचे माजी आ. प्राजक्त तनपुरे हेही अजित पवार गटात येतील, अशा शक्यता वाढल्या आहेत.

दुसरीकडे श्रीगोंद्याचे शरद पवार गटाचे नेते व माजी आ. राहुल जगताप यांचे नावही अजित पवार गटाच्या यादीत अग्रभागी आहे. विधानसभा निवडणुकीत राहुल जगताप यांनी बंडखोरी करत सगळ्यांचे लक्ष वेधले होते. ते श्रीगोंद्यात दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. बंडखोरी केल्यानंतर शरद पवार गटातून त्यांची हाकलपट्टी करण्यात आली. त्यामुळे ते आता अजित पवार गटात जातील, हे जवळपास निश्चीत झाले आहे. राहुल जगताप यांचा कुकडी सहकारी साखर कारखाना गेल्या अनेक वर्षांपासून अडचणीत आहे. तो कारखाना फक्त सरकारने मदत केली तरच वाचू शकतो. त्यामुळे राहुल जगतापांना कारखाना वाचविण्यासाठी अजित पवार गटात जाणे क्रमप्राप्त आहे. ते अजित पवार गटात लवकरच प्रवेश करतील, असेही सांगितले जात आहे.

खा. निलेश लंके, माजी आ. प्राजक्त तनपुरे व माजी आ. राहुल जगताप हे तीन मोहरे गळाले तर शरद पवारांसाठी तो मोठा धक्का समजला जात आहे. असे झाले तर शरद पवारांची नगर जिल्ह्यातील ताकद कमी होणार आहे. शिवाय भविष्यात रोहित पवारांनाही अडचणी येणार आहेत. त्याऊलट अजित पवार गटाची ताकद नगर जिल्ह्यात वाढणार आहे. सध्या अजित पवार गटाकडे नगर जिल्ह्यात चार विद्यमान आमदार आहेत. आता हे तीन नेते अजित पवार गटात आल्यास अजित पवारांकडे एक खासदारही वाढणार आहे. शरद पवारांसाठी ही धोक्याची घंटा समजली जात आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts