St Workers News : एसटी महामंडळाच्या माध्यमातून नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. खरं पाहता, एसटीचा प्रवास हा राज्यात सर्वाधिक केला जातो. गेल्या काही वर्षांपासून विशेषता कोरोना काळापासून एसटीची लोकप्रियता कमी होत चालली असली तरी देखील आजही सार्वजनिक वाहतूकीमध्ये एसटीचा बोलबाला कायम आहे.
विशेष बाब अशी की, शिंदे फडणवीस सरकारने राज्यातील महिलांना 50 टक्के एसटी प्रवासात सूट दिल्यापासून एसटीच्या महिला प्रवासी संख्येत कमालीची वाढ झाली आहे. यामुळे एसटी महामंडळाचा महसूल वाढला असून महिलांना देखील या योजनेचा मोठा फायदा होत आहे. शासनाच्या या निर्णयाने एसटी प्रवासाची लोकप्रियता पुन्हा एकदा बहाल होणार आहे. दरम्यान एसटी महामंडळाच्या सुरक्षित प्रवासाला अलीकडील काही वर्षात तडा जात असल्याचे महामंडळाला लक्षात आले आहे.
हे पण वाचा :- 10वी पास तरुणांसाठी एसटी महामंडळात नोकरीची संधी! या पदाच्या रिक्त जागेवर भरती सुरु; आजच करा इथं अर्ज
अनेक चालक आणि वाहक मद्यप्राशन करून एसटी चालवत असल्याचा प्रकार महामंडळाच्या लक्षात आला आहे. तसेच काही वाहक आणि चालक विनागनवेशच कर्तव्यावर हजर होत असल्याचे महामंडळाच्या लक्षात आले आहे. या पार्श्वभूमीवर 27 मार्च 2023 रोजी महामंडळाच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
महामंडळाच्या माध्यमातून कर्तव्यावर जाणाऱ्या सर्व चालक आणि वाहकांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जो कोणी वाहक किंवा चालक गणवेश असेल त्याच्यावर कारवाई करण्याचे देखील निर्देश देण्यात आले आहेत. यासोबतच संबंधित वाहक किंवा चालक मद्यप्राशन करून कर्तव्यावर आहेत का? हे तपासण्यासाठी ब्रेथ अनालायझरचा वापर करण्याचे निर्देश महामंडळ व्यवस्थापकांनी सर्व विभाग नियंत्रकांना दिले आहेत.
या अनुषंगाने महामंडळाच्या व्यवस्थापकांकडून सर्व विभाग नियंत्रकांना एक पत्र निर्गमित करण्यात आले आहे. यामुळे विना गणवेश कामावर जाणाऱ्या आणि मद्यप्राशन करून कामावर जाणाऱ्या एसटी महामंडळातील चालक आणि वाहकांवर कठोर कारवाई यापुढे केली जाणार आहे.
एकंदरीत महामंडळाचा हा निर्णय प्रवाशांच्या दृष्टीने अति महत्त्वाचा आहे. या निर्णयामुळे मद्यप्राशन करून कोणताच चालक किंवा वाहक गाडी चालवणार नाही परिणामी अपघातात कटोती येईल. प्रवाशांचे हित यामुळे जोपासणे शक्य होईल. त्यामुळे या निर्णयाचे निश्चितच सर्वांकडूनच स्वागत होत आहे.
हे पण वाचा :- सोलापूर महानगरपालिकेमध्ये नोकरीची संधी! ‘या’ रिक्त पदासाठी भरती सुरू; दहावी पास करू शकणार अर्ज, पहा डिटेल्स