Semi-High Speed Vande Bharat:- देशामध्ये वाहतूक व्यवस्था बळकट व्हावी याकरिता अनेक रस्ते प्रकल्प तसेच रेल्वे मार्ग सुरू करण्यात येत आहेत व कित्येक रस्ते प्रकल्पांची कामे सध्या सुरू आहेत. यामध्ये जर आपण रेल्वे प्रकल्पांचा विचार केला तर अनेक नवनवीन शहरे नवीन रेल्वे मार्गाने जोडली जाणार आहेत व त्यासोबतच प्रवाशांना सुखद आणि जलद प्रवासाचा अनुभव यावा याकरिता वंदे भारत ट्रेन देखील टप्प्याटप्प्याने सुरू केले जात आहेत.
देशामध्ये 15 फेब्रुवारी 2019 रोजी पहिली वंदे भारत ट्रेन धावली होती व तिचा वेग सरासरी 100 किलोमीटर प्रतितास इतका होता व ती दिल्ली ते वाराणसी दरम्यान धावली. त्यानंतर मात्र टप्प्याटप्प्याने देशातील विविध मार्गावर आता वंदे भारत ट्रेन सुरू होताना आपल्याला दिसून येत आहेत व याला महाराष्ट्र देखील अपवाद नाही.
वंदे भारत सेमी हायस्पीड आहे परंतु ती सध्या तिचा जो काही मुळ वेग आहे.त्यापेक्षा कमी वेगात सध्या देशात धावत आहे. जर आपण मूळ वेग पाहिला तर तो 160 किलोमीटर प्रतितास इतका आहे. परंतु भारतीय रेल्वेच्या सध्या रुळांची जी काही स्थिती आहे त्यामुळे ती तिच्या मुळ वेगापेक्षा कमी म्हणजेच प्रतितास 130 किलोमीटर या वेगाने धावत आहे. परंतु आता मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर 160 किलोमीटर प्रतितास वेगाने वंदे भारत सेमी हायस्पीड ट्रेन धावणार आहे.
मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणार पहिली सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेन
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पाहिले तर भारतीय रेल्वेच्या जो काही पश्चिम रेल्वे विभाग आहे त्या विभागाच्या माध्यमातून मुंबई आणि वडोदरा डिव्हिजनला रेल्वे बोर्डाच्या माध्यमातून 30 जून पर्यंत मुंबई ते अहमदाबाद या मार्गावरील जे काही रेल्वे रूळ आहेत त्यांची क्षमता वाढवण्यासाठी आवश्यक काम करण्याचे आदेश दिले असून या मार्गावर कम्फरमेट्री ओसिलोग्राफ कार चालवून टेस्ट घेण्याच्या सूचना देखील रेल्वे बोर्डाच्या माध्यमातून डिव्हिजनला देण्यात आलेले आहेत.
ही चाचणी जेव्हा यशस्वी होईल तेव्हा 15 ऑगस्ट पासून वंदे भारत एक्सप्रेसला मूळ सेमी हायस्पीड वेगामध्ये चालवणे शक्य होणार आहे. जर आपण या दोन्ही शहरां दरम्यानचे अंतर पाहिले तर ते 491 किलोमीटर इतके आहे व सध्या हे अंतर पूर्ण करण्यासाठी सध्या सुरू असलेल्या वंदे भारत ट्रेनला एकूण पाच तास पंधरा मिनिटांचा कालावधी लागत आहे. जेव्हा ही आता सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेन 160 किलोमीटर प्रति तासाने धावेल तेव्हा या मार्गावर प्रवाशांचा तब्बल अर्धा तासांचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे.
सध्या मुंबई ते अहमदाबाद मार्गावर सुरू आहेत दोन वंदे भारत ट्रेन व असे आहे त्यांचे वेळापत्रक
सध्या मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद मार्गावर दोन वंदे भारत एक्सप्रेस सुरू असून त्यातील एक ट्रेन आठवड्यातील रविवार आणि दुसरी बुधवार सोडून आठवड्यातील सर्व दिवस नियमितपणे धावतात. यामध्ये अहमदाबाद ते मुंबई ट्रेन क्रमांक 22962 अहमदाबाद येथून सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी निघते
आणि सकाळी अकरा वाजून 35 मिनिटांनी मुंबई सेंट्रलला पोहोचते व परतीच्या प्रवासाची वंदे भारत दुपारी तीन वाजून 55 मिनिटांनी मुंबई सेंट्रल वरून निघते आणि रात्री नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी अहमदाबादला पोहोचते.या मार्गावर या ट्रेनला साधारणपणे वडोदरा तसेच सुरत,वापी आणि बोरिवली हे थांबे देण्यात आलेले आहेत.