स्पेशल

मुलां-मुलींच्या उज्वल आर्थिक भविष्यासाठी आजच सुरू करा ‘या’ योजनांमध्ये गुंतवणूक! नाही राहणार मुला-मुलींच्या लग्न व शिक्षणाची चिंता

Investment Scheme For Children:- जीवन जगत असताना भविष्यकाळामध्ये आर्थिक दृष्टिकोनात ज्या काही गरजा असतात त्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला आतापासूनच बचत करून त्या बचतीचे चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करणे गरजेचे असते.चांगल्या पर्यायांमध्ये किंवा चांगल्या योजनांमध्ये जर गुंतवणूक केली तर कालांतराने त्या माध्यमातून परताव्याच्या रूपात चांगले पैसे मिळतात

व त्यातून आपण अनेक प्रकारच्या भविष्यकालीन आर्थिक गरजा भागवू शकतो. यामध्ये जर आपण बघितले तर भविष्यामध्ये मुला मुलींचे शिक्षण आणि त्यांचे लग्न याकरिता फार मोठ्या प्रमाणावर खर्च प्रत्येकाला करावा लागतो. त्यामुळे अशा प्रकारचा मोठा खर्च पूर्ण करता येईल याकरिता तुम्ही आतापासूनच गुंतवणुकीचे नियोजन करून मुलांच्या शिक्षण व लग्न करिता नियोजन करून ठेवणे गरजेचे ठरेल.

मुला-मुलींच्या लग्न व शिक्षणासाठी या योजनांमधील गुंतवणूक ठरेल फायद्याची

1- आयुर्विमा महामंडळाच्या म्हणजेच एलआयसीच्या योजना- मुलांचे उच्च शिक्षण आणि लग्नासारख्या गोष्टींसाठी लागणारा खर्च पूर्ण करता यावा या उद्दिष्टाने एलआयसीच्या योजनांचा देखील पर्याय चांगला ठरतो. एखाद्या अवघड अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये आर्थिक सुरक्षा देण्यासोबत विविध विम्यातील गुंतवणूक एक चांगला पर्याय ठरू शकतो.

एलआयसीच्या अनेक प्रकारचे प्लान्स खूप महत्त्वाचे आहेत. जर एखादी अनपेक्षित घटना जीवनात घडली तर तेव्हा आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून या योजनेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

2- म्युच्युअल फंड एसआयपी- समजा तुम्हाला जर प्रत्येक महिन्याला एक निश्चित रक्कम वाचवणे शक्य असेल तर तुमच्याकरिता एसआयपी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

तुम्हाला जर एखादया योजनेत एकरकमी गुंतवणूक करणे शक्य नसेल तर तुम्ही मॅच्युअल फंड एसआयपी या पर्यायाचा वापर करू शकतात. यात जर तुम्ही दीर्घ कालावधीपर्यंत गुंतवणूक केली तर तुम्हाला चांगला परतावा मिळतो.

3- मुदत ठेव योजना किंवा रिकरिंग डिपॉझिट योजना- तुम्हाला जर गुंतवणुकीमध्ये कुठलीही जोखीम घ्यायची नसेल तर तुम्ही मुदत ठेव म्हणजे एफडी किंवा पोस्टाच्या रिकरींग डिपॉझिट योजनेत पैसे गुंतवू शकतात.

या दोन्ही योजनांमध्ये निश्चित व्याजदर असतो व गुंतवणुक देखील सुरक्षित असते. यामध्ये निश्चित परतावा मिळतो. ज्या गुंतवणूकदारांना जोखीम घ्यायची नसते असे गुंतवणूकदार या पर्यायांमध्ये गुंतवणूक करू शकतात.

4- सुकन्या समृद्धी योजना- मुलीच्या उज्वल भविष्यासाठी सुकन्या समृद्धी योजना ही एक महत्त्वाची योजना असून मुलींच्या आर्थिक भविष्याच्या दृष्टिकोनातून या योजनेला दुसरा पर्याय नाही. सुकन्या समृद्धी योजनेमध्ये दहा वर्षापर्यंत असलेल्या मुलीच्या नावे गुंतवणूक करता येऊ शकते.

या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर कर सवलत देखील मिळते. दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केली तर यातील पैसा मुलींचे शिक्षण व लग्नासाठी वापरता येतो व आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून देखील महत्त्वाचा ठरतो.

5- सोन्याची खरेदी- भारतामध्ये गुंतवणूक करण्याचा पारंपारिक पर्याय जर कुठला असेल तर तो म्हणजे सोने खरेदी होय. तुम्हाला जर गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही सोने खरेदी करू शकतात व ते तुमच्या मुलांच्या नावावर ठेवू शकतात.

जर आपण सोन्यातील गुंतवणुकीतून मिळणारा परतावा बघितला तर गेल्या काही वर्षांमध्ये शेअर बाजारातील गुंतवणुकीतून मिळणाऱ्या परताव्यासारखा मोठा परतावा सोन्याने दिला आहे.

6- पीपीएफ अर्थात सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना- मुलांच्या उज्वल भविष्याकरिता जर तुम्हाला निधी तयार करायचा असेल तर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी अर्थात पीपीएफ ही योजना चांगला पर्याय आहे. हे सरकारी योजना असून यात केलेल्या गुंतवणुकीवर आकर्षक कर लाभ देखील मिळतो. पंधरा वर्षाच्या कालावधीपर्यंत या योजनेत गुंतवणूक करता येते व यातील गुंतवणुकीसाठीचा कालावधी तुम्ही पाच-पाच वर्षांनी देखील वाढवू शकतात व मोठा परतावा मिळवू शकतात.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts