State Employee DA Hike : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी 2023 पासून महागाई भत्ता वाढ अनुज्ञय केली जाणार आहे. म्हणजेच सध्या मिळत असलेल्या महागाई भत्ता दरात वाढ होणार आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे.
यामध्ये अजून चार टक्के इतका महागाई भत्ता इन्क्रिमेंटचा लाभ या सरकारी कर्मचाऱ्यांच्ना मिळणार आहे. महागाई भत्ता म्हणजे DA वाढ ही एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार ठरवली जाते. ही आकडेवारी नुकतीच कामगार मंत्रालयाकडून सार्वजनिक करण्यात आली आहे. ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकानुसार आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा DA चार टक्के इतका वाढवला जाणार आहे.
म्हणजेच सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 38% इतका महागाई भत्ता मिळत असून यामध्ये चार टक्के इतकी वाढ होणार आहे. आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना ही महागाई भत्ता वाढ मार्च महिन्यापासून प्रत्यक्षात लागू होणार आहे. म्हणजेच होळीच्या सणाला केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडून गुड न्यूज मिळणार आहे. सेंट्रल मधील कर्मचाऱ्यांना ही वाढ लागू झाल्यानंतर राज्य शासकीय सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना देखील हा लाभ देण अपेक्षित राहणार आहे.
यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना देखील 42 टक्के दराने महागाई भत्ता जानेवारी महिन्यापासून मिळणार आहे. याची प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र मार्च महिन्यापासून होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील कर्मचाऱ्यांना वर्ग केली जाणार आहे. यामुळे निश्चितच राज्य कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा होईल असं सांगितलं जात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होणार आहे.
वास्तविक ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाची आकडेवारी समोर आली नव्हती तेव्हा कर्मचाऱ्यांना केवळ तीन टक्के इतका महागाई भत्ता वाढीचा लाभ जानेवारी महिन्यापासून मिळेल असं सांगितलं जात होतं. परंतु, आता ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाचे आकडेवारी समोर आली असून चार टक्के महागाई भत्ता वाढ कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासून मिळेल हे आता निश्चित झाल आहे.
मात्र प्रत्यक्ष या वाढीचा लाभ कोणत्या महिन्यापासून मिळेल याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये मार्च महिन्याच्या वेतनासोबत हा लाभ रोखीने लागू केला जाईल असं सांगितलं जात आहे. असं झालं तर कर्मचाऱ्यांना दोन महिन्याची थकबाकी देखील मार्च महिन्याच्या वेतना सोबत दिली जाणार आहे.