State Employee DA Hike : केंद्र शासनाकडून नुकतीच केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट देण्यात आली आहे. केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ केली आहे. म्हणजेच आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता लागू झाला आहे. दरम्यान डीएवाढीबाबत महाराष्ट्र राज्य सरकारने देखील मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील काही कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात शासनाच्या माध्यमातून वाढ करण्यात आली आहे.
आज आपण नेमक्या कोणत्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला गेला आहे याविषयी जाणून घेणार आहोत. खरं पाहता, केंद्राने महागाई भत्ता वाढवल्यानंतर लगेचच राजस्थान सरकारने महागाई भत्ता वाढवला. आता महाराष्ट्र राज्य शासनाने देखील यासंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने काही कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये 4% वाढ केली आहे.
हे पण वाचा :- मुंबईतल्या व्यवसायाला ठोकला रामराम! गावी परतत सुरू केली आधुनिक पद्धतीने शेती; अवघ्या 3 महिन्यात बनला लखपती, पहा काय केलं…
कोणत्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात झाली वाढ?
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या अखिल भारतीय सेवेमधील अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. वास्तविक या कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आणि भत्ते मिळत असतात. याच पार्श्वभूमीवर केंद्राने महागाई भत्ता वाढवल्यानंतर या कर्मचाऱ्यांना देखील महागाई भत्ता वाढ देणे जरुरीचे होते.
यामुळेच महाराष्ट्र राज्य शासनाकडून अखिल भारतीय सेवेमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना चार टक्के महागाई भत्ता वाढ देण्यात आली आहे. म्हणजे आता अखिल भारतीय सेवेत कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो, उन्हाळी हंगामात ‘या’ भाजीपाला पिकांची शेती सुरू करा; चांगली कमाई होणार, कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला
महागाई भत्त्यात करण्यात आलेली चार टक्के वाढ जानेवारी महिन्यापासून लागू राहणार आहे. यामुळे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यातील महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील या संबंधित कर्मचाऱ्यांना आता मिळणार आहे. दरम्यान आता राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांना देखील लवकरात लवकर महागाई भत्ता वाढ दिली पाहिजे अशी मागणी जोर धरू लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आणि काही मीडिया रिपोर्टमध्ये सांगितल्याप्रमाणे राज्य शासन देखील लवकरच राज्य कर्मचाऱ्यांना डीए वाढ देणार आहे. यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना देखील लवकरच शिंदे सरकार गोड बातमी देईल असा आशावाद या निमित्ताने व्यक्त होत आहे.
हे पण वाचा :- सोयाबीन उत्पादकांना लवकरच मिळणार गोड बातमी; दरात ‘या’ एका कारणामुळे होणार वाढ, पहा तज्ज्ञांचा अंदाज