स्पेशल

State Employee DA Hike : शिंदे-फडणवीस सरकारचे अजून एक मोठं गिफ्ट ! आता ‘त्या’ राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात केली 4% वाढ

State Employee DA Hike : गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना अच्छे दिन आले आहेत.  मंगळवारी राज्य शासनाकडून एकूण दोन मोठे निर्णय घेण्यात आले होते. यामध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य शासनाने के पी बक्षी समितीच्या शिफारशी राज्य कर्मचाऱ्यांना लागू केल्यात.

याशिवाय, महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभागाने 10 जानेवारी म्हणजेच मंगळवारी शासन निर्णय निर्गमित करून राज्यातील कार्यरत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली. या शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना 4% महागाई भत्ता म्हणजेच डी ए वाढ लागू झाली अर्थातचं आता 38% दराने महागाई भत्ता त्यांना मिळणार आहे.

दरम्यान काल वित्त विभागाने अजून एक मोठा निर्णय घेतला आहे. वित्त विभागाने काल 11 जानेवारी रोजी शासन निर्णय घेऊन राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक आणि निवृत्तीवेतनधारक कुटुंबांना दिल्या जाणाऱ्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे. या निवृत्तीवेतनधारकांना देखील आता चार टक्के महागाई भत्ता वाढीचा लाभ अनुज्ञय झाला आहे.

अर्थातच या कर्मचाऱ्यांना देखील 38 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे. म्हणजेच राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच आता या निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात देखील वाढ झाली आहे. हा लागू झालेला महागाई भत्ता जुलै महिन्यापासून देय राहणार असून याचा रोखीने लाभ या चालू महिन्यापासून मिळणार आहे. अर्थातच जुलै ते डिसेंबर दरम्यानची डीए थकबाकी देखील संबंधितांना मिळणार आहे.

त्यासोबतच सहाव्या वेतन आयोगानुसार असूधारित वेतन श्रेणीत असलेल्या निवृत्तीवेतनधारकांना महागाई भत्ता 203 टक्क्यांवरून 212 टक्के आणि पाचव्या वेतन आयोगानुसार असूधारित वेतनश्रेणीत असलेल्या निवृत्तीवेतनधारकांना 381 टक्क्यांवरून 396% महागाई भत्ता अनुज्ञय झाला आहे. यामुळे निश्चितच राज्य कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे.

निश्चितच शिंदे फडणवीस सरकारने मकर संक्रांतिपूर्वीच राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठे निर्णय घेऊन त्यांना संक्रांतीचे एक मोठं गिफ्ट दिल्याचे सांगितले जात आहे. सणासुदीच्या दिवसात घेण्यात आलेले हे निर्णय निश्चितच कर्मचारी हिताचे असून याचा कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.

शासनाने महागाई भत्ता वाढीचा निर्णय उशिराने घेतल्याच्या तक्रारी देखील राज्य कर्मचाऱ्यांकडून केल्या जात आहेत. मात्र देर आए दुरुस्त आए प्रमाणे कर्मचाऱ्यांकडून समाधान देखील व्यक्त केले जात आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts