State Employee News : महाराष्ट्रातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे. खरं पाहता राज्य शासनाने खाजगी विनाअनुदानित प्राथमिक माध्यमिक शाळांच्या अनुदानात वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
याच्या माध्यमातून राज्यातील जवळपास 63 हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. खरं पाहता राज्यातील माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनुदानाच्या आधारे मासिक वेतन मिळत असते. म्हणजे 20 टक्के, 40 टक्के आशा अनुदानाच्या आधारे त्यांना वेतन देऊ केल जात.
अशातच या वेतनात वाढ करण्यासाठी गेल्या महिन्यात शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी वाढीव अनुदानाची घोषणा केली आहे. यामुळे राज्यातील 63 हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना फायदा होणार असल्याचे सांगितले जात असून नाशिक जिल्ह्यातही संबंधित कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा
हाती आलेल्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यात 20 टक्के अनुदानासाठी 888 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पात्र ठरणार आहेत. तसेच 40% अनुदानासाठी 213 कर्मचारी हे पात्र राहतील. म्हणजेच जिल्ह्यातील 1101 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यासाठी पात्र राहणार आहेत.
यानंतर या संबंधित कर्मचाऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर नियुक्ती देखील दिली जाते. एकंदरीत वर्षानुवर्ष अनुदानाची वाट पाहणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ही एक आनंदाची पर्वणीच आहे. याचा राज्यातील 63 हजार कर्मचाऱ्यांना फायदा होणार असून यासाठी 1660 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
खरं पाहता प्रत्येक वर्षी वाढीव 20 टक्के अनुदान मिळण्याची शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आशा असते. मात्र राज्य शासन यावर वेळेत निर्णय घेत नाही. मात्र आता शिंदे फडणवीस सरकारने हा निर्णय घेतला असून यामुळे राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना निश्चितच दिलासा मिळणार आहे.