State Employee News : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. 23 तारखेला निकाल जाहीर झाला असून आता येत्या एक-दोन दिवसात नवीन सरकार सत्ता स्थापित करणार आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापित झाले असून आता आचारसंहिता संपली आहे.
खरे तर आचारसंहितेमुळे राज्यातील बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या काळात बोनसची रक्कम मिळू शकली नाही. यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनसविनाचं दिवाळीचा मोठा सण साजरा करावा लागला.
मात्र, आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठी लागू असणारी आचारसंहिता संपली असून बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी देखील गुड न्यूज हाती आली आहे. आचारसंहिता संपली असल्याने आता बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महत्त्वाचे म्हणजे ही बोनसची रक्कम आज अर्थात 26 नोव्हेंबर 2024 रोजी पात्र ठरणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार असल्याची खात्रीलायक बातमी एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.
बेस्टच्या एका अधिकाऱ्याने, आज बेस्टच्या कर्मचाऱ्यांना 29 हजार रुपयांचा दिवाळी बोनस दिला जाईल अशी माहिती दिली आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळावा या अनुषंगाने पालिका प्रशासनाने ८० कोटी रुपयांची रक्कम बेस्टच्या बँक खात्यात ऑनलाईन जमा केली होती.
पण, आचारसंहिता लागू झाल्यामुळे बेस्ट कामगार कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानाचे वाटप करता आले नव्हते. खरंतर बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनसची रक्कम मिळावी यासाठी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया कडे याबाबतची मागणी करण्यात आली होती.
मात्र आचारसंहिता सुरू असल्याने इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ने बोनसची रक्कम संबंधित पात्र कर्मचाऱ्यांना वितरित करण्याची परवानगी दिली नाही. पण आता आचारसंहिता संपली असून या संबंधित बेस्ट कर्मचाऱ्यांच्या खात्यात आता बोनसची रक्कम जमा होणार आहे.
नक्कीच आज जर या कर्मचाऱ्यांच्या खात्यात बोनस चा पैसा जमा झाला तर त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. उशिरा का होईना पण या पैशांचा या सदरील कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.