स्पेशल

शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ! ‘या’ कर्मचाऱ्यांसाठी केली ‘ही’ मोठी घोषणा

State Employee News : शिंदे फडणवीस सरकारने आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय राज्यातील सफाई कामगारांच्या दृष्टीने अति महत्त्वाचा आहे. वास्तविक गेल्या अनेक दिवसांपासून सफाई कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या कर्मचारी संघटनांकडून लाड समितीच्या शिफारशी शासनाने लागू कराव्यात अशी मागणी जोर धरत होती.

अखेर सफाई कर्मचाऱ्यांची ही मागणी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्य करण्यात आली आहे. सकाळी कामगारांच्या व्याख्येत बसणाऱ्या राज्यातील सर्व सफाई कामगारांना या शिफारशी लागू राहणार आहेत. यामुळे सफाई कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला असल्याची भावना कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून समोर येत आहे.

म्हणजेच आता एखाद्या कामगाराचे पद काहीही असले आणि त्याला सफाईचे संबंधित काम दिलेले असेल तर अशा कामगारांना देखील सफाई कामगार म्हणून संबोधले जाईल आणि त्यांना जे सफाई कामगारांना लाभ दिले जातात ते लाभ देऊ केले जातील. तसेच या समितीच्या शिफारशीनुसार आता डोक्यावरून महिला वाहण्याचे काम केलेल्या सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्काने नोकरीत प्राधान्य दिलं जाणार आहे.

निश्चितच वारसा हक्कासाठी झटणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे. वारसा हक्कासाठी सुधारित तरतुदी लागू झाल्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांची गेल्या अनेक वर्षांपासून ची मागणी मार्गी लागली आहे. आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे कोणत्या सफाई कामगारांच्या वारसांना सरकारी नोकरीत प्राधान्य दिले जाईल.

तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, शौचालय स्वच्छता आणि घाणीशी संबंधित मल निसारण व्यवस्था, नाली गटारे, ड्रेनेज तसेच रुग्णालय आणि शवविच्छेदनगृहातील घाणीशी संबंधित ठिकाणी सफाईचे काम करणारे अनुसूचित जाती, नवंबौद्ध प्रवर्ग तसेच सफाई कामगारांच्या व्याख्येत बसणारे सर्व कामगार आणि पूर्वी डोक्यावरून मैला वाहून नेण्याचे काम करणारे कामगार यांच्या वारसांना सरकारी नोकरीत प्राधान्य दिले जाणार आहे.

निश्चितच राज्य शासनाकडून घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील सफाई कामगारांना न्याय मिळाला आहे. यामुळे शासनाच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यासाठी मात्र सफाई कामगारांना मोठा लढा उभारावा लागला होता. यामुळे आज कामगारांचा लढा यशस्वी झाल्याची प्रतिक्रिया कामगारांकडून दिली जात आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts