State Employee News : राज्यात हिवाळी अधिवेशनाप्रमाणेच अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील चांगलेच चर्चेत आले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रलंबित मागण्यांबाबत विधानसभा सदस्यांच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शासनाकडून देखील या प्रश्नांवर सखोल अशी चर्चा होत असून उत्तरे संबंधितांना दिली जात आहेत. काल परवा जुनी पेन्शन योजनेबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोठा गोंधळ पाहायला मिळाला.
दरम्यान आता राजधानी मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 2023 मधून एक मोठी माहिती समोर येत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्यांच्या नैमित्तीक रजाबाबत माहिती देताना सांगितले की, राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक या पदाच्या नैमित्तिक रजा वाढवण्यात आल्या आहेत.
हा निर्णय ऑक्टोबर 2022 मध्ये झाला आहे. या पार्श्वभूमीवर 3 ऑक्टोबर 2022 शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून एक शासन निर्णय देखील निर्गमित झाला आहे. या शासन निर्णयानुसार राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना वीस दिवसाची नैमित्तिक रजा मंजूर केली जाणार आहे. म्हणजेच आतापर्यंत या पोलीस कर्मचाऱ्यांना 12 दिवस नैमित्तिक रजा मिळत होती त्यामध्ये आठ दिवसांची वाढ राज्य शासनाच्या माध्यमातून देऊ करण्यात आली आहे.
या वीस दिवसाच्या नैमित्तिक रजा विशेष बाब म्हणून सदर कर्मचाऱ्यांना अनुज्ञयं करून दिल्या जाणार आहेत. वास्तविक पोलीस कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या संघटनांकडून याबाबत कायमच शासनाकडे मागणी केली जात होती. अनेकदा यासाठी निवेदने देण्यात आली अनेकदा आंदोलने देखील झाली. सरकार पोलीस कर्मचाऱ्यांच्या या मागणीवर शासनाने सकारात्मक निर्णय घेतला.
गेल्या वर्षी ऑक्टोबर 2022 मध्ये या पार्श्वभूमीवर शासन निर्णय काढून राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. या शासन निर्णयाची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच विधानभवनात दिली आहे. पुरवणी मागणी संदर्भात माहिती देताना फडणवीस यांनी ही माहिती देखील दिली.