State Employee News : गेल्या अनेक वर्षापासून शासकीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी मागणी केली जात आहे. खरं पाहता शासकीय कर्मचाऱ्यांना 2005 नंतर जुनी पेन्शन योजना लागू न करता नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. मात्र या नवीन पेन्शनचा म्हणजे NPS चा अगदी सुरुवातीपासून विरोध होत आहे. ही नवीन योजना रद्द करून जुनी योजना म्हणजे OPS लागू करावी अशी मागणी कर्मचाऱ्यांची आहे.
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांकडून आता या आपल्या प्रमुख मागणीसाठी संपाच हत्यार उपसण्यात आल आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीने दिनांक 14 मार्च 2023 पासून बेमुदत संपाची घोषणा केली आहे. या शिक्षक समितीचे प्राथमिक शिक्षक संपावर जाणार असून या अनुषंगाने या शिक्षक समितीच्या माध्यमातून एक मार्च 2023 रोजी शासनाला नोटीस देण्यात आली आहे.
यावेळी या समितीकडून सर्व शिक्षकांना संपात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वास्तविक 14 मार्चपासून राज्यातील 17 लाख शासकीय, निमशासकीय, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू करणे या आपल्या प्रमुख मागणीसाठी संपावर जाणार आहेत. याच संपात महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती देखील आपला सहभाग नोंदवणार आहे.
राज्य कर्मचाऱ्यांची ही मागणी पाहता गेल्या काही दिवसांपासून शिंदे फडणवीस सरकारकडून ओ पी एस योजनेबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगितलं जात आहे. डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनातं सरकारच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली तर राज्य शासनावर एक लाख दहा हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडेल आणि राज्य दिवाळखोरीत जाईल असं सांगितलं जात होत.
मात्र आता आगामी काळात निवडणुका सुरु होणार असल्याने सरकारने आपला एजेंडा बदलला आहे. आता शासनाकडून जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आम्ही सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान आता राज्य शासकीय कर्मचारी संपावर जाणार आहेत. यामुळे आता शासनाकडून जुनी पेन्शन योजनेबाबत नेमकां काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.