State Employee News : केंद्र शासनाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी एक मोठा निर्णय घेतला. या निर्णयाअन्वये केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचे काम शासनाकडून झाले आहे. केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्के वाढवला आहे. म्हणजेच आता या सेंट्रल गव्हर्नमेंट मधील कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे. यासाठीचा शासन निर्णय नुकताच केंद्र शासनाच्या माध्यमातून काढण्यात आला असून ही महागाई भत्ता वाढ जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आली आहे.
म्हणजेच कर्मचाऱ्यांना दोन महिन्याचा महागाई भत्ता थकबाकी देखील मिळणार आहे. मार्च महिन्याच्या वेतन देयकासोबत हा लाभ रोखीने कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे. केंद्र शासनाने डीएवाढीचा निर्णय घेतल्यानंतर लगेचच राजस्थान सरकारने देखील आपल्या राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढीचा निर्णय घेतला.
हे पण वाचा :- पंजाबरावांचा एप्रिल महिन्यातील हवामान अंदाज; ‘हे’ सहा दिवस पडणार मुसळधार पाऊस !
राजस्थान सरकारने तेथील कर्मचाऱ्यांना 4% महागाई भत्ता वाढ दिली. दरम्यान आता महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक मोठी माहिती समोर आली आहे. राज्यातील जवळपास 18 लाख कर्मचाऱ्यांच्या बाबतीत लवकरच एक निर्णय घेतला जाणार आहे.
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना आता केंद्र शासनाच्या धर्तीवर चार टक्के महागाई भत्ता वाढ दिली जाणार आहे. यासाठीचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य वित्त विभागाकडून तयार झाला असल्याची माहिती एका मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून देण्यात आली आहे. म्हणजे आगामी काही दिवसात राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना देखील 42 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे.
हे पण वाचा :- महाराष्ट्रासाठी चिंताजनक! आणखी ‘इतके’ दिवस कोसळणार मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा गंभीर इशारा
दरम्यान, कर्मचाऱ्यांना ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू केली जाणार आहे. यामुळे महागाई भत्ता फरकाची रक्कम ही कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. दरम्यान आता आपण 42 टक्के दराने महागाई भत्ता मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या वेतनात किती वाढ होणार हे जाणून घेऊया.
जर एखाद्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना तीस हजार रुपये वेतन असेल तर अशा कर्मचाऱ्यांना आता बारा हजार सहाशे रुपये महागाई भत्ता मिळणार आहे. याच कर्मचाऱ्यांना आतापर्यंत 38 टक्के दराने ११४०० रुपये महागाई भत्ता मिळत होता. म्हणजेच 30000 रुपये वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना 1200 रुपये इतका वेतन वाढीचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे.
हे पण वाचा :- अहमदनगरकरांसाठी महत्वाची बातमी; सातबारा, गाव नमुना नंबर 8 अ, जमिनीचा नकाशा अन ‘हे’ अभिलेख उतारे ऑनलाईन घरबसल्या मिळवा, कसं ते पहा….