स्पेशल

State Employee News : ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांना प्रशासनाचा दे धक्का ! घेतला ‘हा’ मोठा निर्णय ; वाचा काय आहे माजरा

State Employee News : राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. बनावट प्रमाणपत्र सादर करून बदली करून घेणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात प्रशासनाकडून लवकरच कारवाई केली जाणार आहे. बनावट वैद्यकीय प्रमाणपत्राचा वापर करून ज्या कर्मचाऱ्यांनी बदल्या केल्या आहेत अशा कर्मचाऱ्यांवर प्रशासनाकडून आता कारवाई केली जाणार आहे.

यासंदर्भात राज्य शासनाकडून जिल्हा परिषदेतील कर्मचारी तसेच शिक्षकांचे वैद्यकीय प्रमाणपत्र पडताळणीसाठी आदेश देण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे ज्या राज्य कर्मचाऱ्यांनी बोगस प्रमाणपत्र घेऊन आपल्या बदल्या घडून आणल्या आहेत अशा राज्य कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की नाशिक जिल्हा रुग्णालयाकडून बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र घेऊन आंतरजिल्हा बदली करण्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. यामुळे नाशिक जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिया मित्तल यांनी वैद्यकीय प्रमाणपत्र तपासणी बाबत महत्वपूर्ण आदेश जारी करत पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दरम्यान आता या घटनेची राज्य शासनाकडून दखल घेतली जाण्याची शक्यता आहे. राज्य शासनाकडून ज्या कर्मचाऱ्यांनी विभागीय बदलीसाठी अशा पद्धतीने बनावट वैद्यकीय प्रमाणपत्राचा वापर करून बदली घडून आणली असेल अशांवर कारवाई केली जाऊ शकते. निश्चितच ज्या राज्य कर्मचाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने बदली घडवून आणली आहे त्या राज्य कर्मचाऱ्यांची धाबे दनाणली आणले आहेत.

दरम्यान जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असलेले अनेक कर्मचारी, शिक्षक यांनी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्राचा सहारा घेत बदली घडवून आणण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अशा परिस्थितीत या घटनेशी संबंधित असणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरदेखील कारवाईचे टांगती तलवार आहे. यामुळे आता या चुकीच्या पद्धतीने बदली केलेल्या कर्मचाऱ्यांवर शासनाकडून काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts