State Employee News : राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. वास्तविक नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या हितार्थ एक मोठा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासून डीए वाढ लागू करण्यात आले आहे. या महागाई भत्ता वाढीनंतर आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे.
त्याआधी महागाई भत्ता 38 टक्के होता. दरम्यान केंद्र शासनाच्या या निर्णयानंतर राजस्थान सरकारने देखील आपल्या राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढीचा निर्णय घेतला.
हे पण वाचा :- शेअर मार्केटमध्ये एक सामान्य व्यक्ती किती रुपये गुंतवू शकतो? काय आहेत शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचे सरकारी नियम, पहा…
अशा परिस्थितीत, महाराष्ट्र राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी देखील राज्य शासनाने लवकरात लवकर महागाई भत्ता वाढ राज्य कर्मचाऱ्यांना लागू करावी अशी मागणी केली आहे.
यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. खरं पाहता मे महिन्यापासून DA वाढ दिली जाईल असं सांगितलं जात होतं. मात्र तसं काही झालं नाही परंतु आता जुलै महिन्यात डीए वाढ दिली जाणार आहेत.
काही मीडिया रिपोर्ट मध्ये या संदर्भात मोठा दावा करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर महागाई भत्ता वाढी संदर्भात वित्त विभागाने नवीन सुधारित प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला आहे.
हे पण वाचा :- बोरिवली-ठाणे दुहेरी बोगद्याचे टेंडर मेघा कंपनीला मिळाले; केव्हा सुरु होणार या भूमिगत मार्गाचे काम, पहा….
यानुसार आता राज्य शासकीय सेवेतील राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासून महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जाणार आहे. 4% डी ए वाढ होईल म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्यातील कर्मचाऱ्यांना देखील 42 टक्के दराने डीए मिळणार आहे.
शिवाय जानेवारी महिन्यापासून हा लाभ लागू होणार असल्याने महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील त्यांना मिळणार आहे. एकंदरीत जुलै महिन्याच्या वेतनासोबत तसेच पेन्शन देयकासोबत आता 42 टक्के दराने महागाई भत्याचा लाभ राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार असल्याचे चित्र तयार झाले आहे.
हे पण वाचा :- मोचा चक्रीवादळाचा महाराष्ट्रालाही धोका वाढला! ‘या’ भागात पडणार वादळी वाऱ्यासह पाऊस, भारतीय हवामान विभागाचा इशारा