State Employee News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर येत्या काही दिवसांनी दीपोत्सवाला सुरुवात होणार आहे. दीपोत्सव अर्थातच दिवाळीचा सण 28 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. 28 ऑक्टोबरला वसुबारस आणि याच दिवसापासून दीपोत्सवाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते.
दरम्यान वसुबारसपूर्वीच अर्थातच दीपोत्सवाच्या आधीच राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. खरे तर ऑक्टोबर महिन्याचे वेतन हे नोव्हेंबर महिन्यात मिळणार होते.
मात्र दिवाळी सणाचा काळ पाहता शासनाच्या माध्यमातून हे वेतन 31 ऑक्टोबर पर्यंत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आलेत. दरम्यान आता हे वेतन 28 ऑक्टोबरच्या आधीच राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची बातमी समोर आली आहे.
काल याबाबतचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे. सदर शासन निर्णयानुसार राज्य कर्मचाऱ्यांचे वेतन हे 25 ऑक्टोबरपर्यंत त्यांच्या खात्यात जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्य शासनाच्या वित्त विभागाने काढलेल्या या शासन निर्णयानुसार, दिनांक 31 ऑक्टोबर 2024 रोजी देय ठरणारे माहे ऑक्टोबर 2024 चे वेतन आणि निवृत्तीवेतन दिनांक 25 ऑक्टोबर 2024 पूर्वी अदा करण्यास राज्य सरकारकडून मान्यता देण्यात येत आहे.
याकरिता महाराष्ट्र कोषागार नियम 329 मधील तरतुदी शिथिल करण्यात येत असल्याचेही या जीआर मध्ये नमूद करण्यात आले आहे. अर्थातच दीपोत्सवाचा सण सुरू होण्याच्या तीन दिवस आधीच राज्य कर्मचाऱ्यांना यावेळी वेतन मिळू शकणार आहे.
यामुळे दिवाळीचा सण यंदा राज्य कर्मचाऱ्यांना मोठ्या उत्साहात साजरा करता येईल अशी आशा आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून निर्गमित करण्यात आलेल्या या शासन निर्णयाचे स्वागत केले जात आहे.
हा निर्णय राज्य कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून फारच फायद्याचा असून यंदा तरी दिवाळीचा सण उत्साहात पार पडेल असे अनेक कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे.