स्पेशल

राज्य कर्मचाऱ्यांसाठी गुड न्युज ! ‘या’ महिन्याच्या पगारसोबत मिळणार सातव्या वेतन आयोगाची थकबाकी

State Employee News : राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकी संदर्भात. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे.

या निर्णयानुसार राज्य कर्मचाऱ्यांना आता सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा 4था हफ्ता लवकरच देऊ केला जाणार आहे. वास्तविक, सातवा वेतन आयोगाची थकबाकी लवकरात लवकर राज्य कर्मचाऱ्यांना दिली जावी अशी मागणी कर्मचाऱ्यांनी लावून धरली होती.

यासाठी कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून शासनाला निवेदने दिली जात होती. दरम्यान या निवेदनावर राज्य शासनाकडून सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाने सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा चौथा हप्ता राज्य कर्मचाऱ्यांना जून महिन्याच्या वेतना सोबत देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

हे पण वाचा :- रेशनकार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी ! 26 मे पर्यंत ‘हे’ काम लवकरात लवकर करा, नाहीतर रेशन मिळणार नाही

हाती आलेल्या माहितीनुसार ही रक्कम काही कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा होईल तर काही कर्मचाऱ्यांना रोखीने अदा केली जाऊ शकते. सातवा वेतन आयोगाचा हा चौथा हप्ता राज्य शासकीय कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे.

एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार जे सेवानिवृत्त कर्मचारी असतील त्यांना सातवा वेतन आयोगाचा हा चौथा हफ्तारोखीनी मिळणार आहे तसेच इतर कर्मचाऱ्यांचा हा 4था हफ्ता भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा केला जाणार आहे.

निश्चितच राज्य शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांचा आर्थिक फायदा होणार आहे. यामुळे राज्य शासनाच्या या निर्णयाचे कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून स्वागत केले जात आहे. 

हे पण वाचा :- तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! ‘या’ सरकारी विभागात निघाली भरती; वाचा सविस्तर

कशी मिळणार थकबाकी

एक जून 2022 ते आजपर्यंत निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना तसेच मयत पावलेल्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा हप्ता रोखीने दिला जाणार आहे. जून महिन्याच्या पगारांसोबत या कर्मचाऱ्यांना रोखीने हा हप्ता मिळणार आहे.

इतर कर्मचाऱ्यांना हा हप्ता भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करून दिला जाणार आहे. विशेष म्हणजे खात्यात जमा होणाऱ्या या रकमेवर एक जुलै 2022 पासून व्याज देखील दिले जाणार आहे. मात्र ही रक्कम कर्मचाऱ्यांना काढता येणार नाही. 

हे पण वाचा :-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा ‘या’ तारखेला सुरु होणार मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प, पीएम मोदी करणार उदघाट्न…..

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts