स्पेशल

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! पुढल्या वर्षी भाऊबीजेच्या दिवशीही राहणार सुट्टी, 2025 मधील सुट्ट्यांची संपूर्ण यादी पहा

State Employee News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे महाराष्ट्र राज्य शासनाने पुढील वर्षी अर्थातच 2025 ला भाऊबीजेच्या दिवशी ही सुट्टी जाहीर करण्याचा मोठा निर्णय घेतलाय. पुढील वर्षी 23 ऑक्टोबर रोजी भाऊबीज हा सण साजरा होणार आहे.

दरम्यान, 23 ऑक्टोबर 2025 रोजी येणाऱ्या याच भाऊबीज सणाला राज्य कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली असे. राज्य शासनाने या संदर्भातील शासन निर्णय नुकताच निर्गमित केला असून भाऊबीजेच्या दिवशी अतिरिक्त सुट्टी देण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला असून या निर्णयामुळे राज्य कर्मचाऱ्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे.

खरंतर लाडकी बहिण योजनेला महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात यश मिळाले असून याच अनुषंगाने आता शासनाने भाऊबीजेच्या दिवशी सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.

नक्कीच शासनाच्या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार असून दिवाळीच्या काळात अतिरिक्त सुट्टी मिळणार असल्याने राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून फडणवीस सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. दरम्यान आता आपण 2025 मध्ये राज्य कर्मचाऱ्यांना नेमक्या किती सुट्ट्या मिळणार या संदर्भात सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत.

2025 मध्ये कोणकोणत्या तारखांना सुट्टी राहणार?

26 जानेवारी : प्रजासत्ताक दिनानिमित्त सुट्टी राहणार आहे.
19 फेब्रुवारी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनानिमित्त या दिवशी सुट्टी राहणार आहे.
26 फेब्रुवारी : महाशिवरात्री निमित्त या दिवशी सुट्टी राहणार आहे.
14 मार्च : होळी सणाच्या पार्श्वभूमीवर 14 मार्चला सुट्टी राहणार आहे.
30 मार्च : गुढीपाडवा सणाच्या पार्श्वभूमीवर 30 मार्चला सुट्टी राहणार आहे.
31 मार्च : रमजान ईद निमित्ताने या दिवशी सार्वजनिक सुट्टी राहणार आहे.
1 एप्रिल : बँकांना आपले वार्षिक लेखे पूर्ण करता यावेत यासाठी या दिवशी फक्त बँका बंद राहणार आहेत.
6 एप्रिल : रामनवमी सणानिमित्त सुट्टी राहणार आहे.
10 एप्रिल : महावीर जन्म कल्याणक निमित्त सार्वजनिक सुट्टी राहणार आहे.
18 एप्रिल : या दिवशी गुड फ्रायडे निमित्त सार्वजनिक सुट्टी बहाल करण्यात आली आहे.
01 मे : महाराष्ट्र दिन निमित्त या दिवशी महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना सुट्टी राहणार आहे.
12 मे : बुद्ध पौर्णिमा निमित्त या दिवशी सार्वजनिक सुट्टी बहाल करण्यात आली आहे.
07 जुन : बकरी ईद निमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
06 जुलै : मोहरम निमित्त या दिवशी सार्वजनिक सुट्टी बहाल करण्यात आली आहे.
15 ऑगस्ट : स्वातंत्र दिन या राष्ट्रीय सणाच्या पार्श्वभूमीवर अन पारशी नववर्ष दिन निमित्त या दिवशी कर्मचाऱ्यांना सुट्टी राहणार आहे.
27 ऑगस्ट : गणेश चतुर्थी निमित्त या दिवशी सार्वजनिक सुट्टी राहणार आहे.
05 सप्टेंबर : ईद – ए मिलाद सणा निमित्त या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे.
02 ऑक्टोंबर : राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त अन विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर या दिवशी सार्वजनिक सुट्टी राहणार आहे.
21 ऑक्टोंबर : दिवाळी अमावस्या ( लक्ष्मीपुजा ) निमित्त सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
22 ऑक्टोंबर : दिवाळी ( बलिप्रतिपदा ) निमित्त सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे.
23 ऑक्टोबर 2025 : भाऊबीज निमित्त या दिवशी सुट्टी राहणार आहे. हा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. फडणवीस सरकारने याबाबतचे परिपत्रक नुकतेच निर्गमित केले आहे.
05 नोव्हेंबर : गुरुनानक जयंती निमित्त या दिवशी सार्वजनिक सुट्टी देण्यात आली आहे.
25 डिसेंबर : ख्रिसमस निमित्त या दिवशी सार्वजनिक सुट्टी बहाल करण्यात आली आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts