स्पेशल

बोंबला…! आता ‘या’ जिल्ह्यातील गुरुजींनाही पगारासाठी वेटिंगवर थांबावं लागणार ; जानेवारीचा पगार अटकणार, पहा डिटेल्स

State Employee News : गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या पगाराचा प्रश्न ऐरणीवर येऊन ठेपला आहे. सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांबाबतही अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. आता जानेवारी महिन्यातील पगार देखील जिल्ह्यातील गुरुजींना उशिरा मिळणार असल्याचे चित्र तयार झाले आहे.

खरं पाहता जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या वेतनासाठी 50 कोटी रुपये जिल्हा परिषदेला आवश्यक होते. मात्र जिल्हा परिषदेला शासनाकडून अवघे 15 कोटी रुपये देण्यात आले आहेत. या निधीतून जत आटपाडी तालुक्यातील शिक्षकांचे डिसेंबर महिन्याचे पगार होणार आहेत. अशा परिस्थितीत जानेवारी महिन्याचे पगार लांबणार आहेत.

जिल्ह्यातील 5500 प्राथमिक शिक्षकांना आता गेल्या महिन्यातील पगार प्राप्तीसाठी वेटिंगवर थांबावं लागणार असल्याचे चित्र तयार झाले आहे. सांगली जिल्ह्यातील शिक्षकांना वेळेवर वेतन मिळत नसल्याने शिक्षकांची आर्थिक कोंडी होत आहे. विशेष म्हणजे गेल्या चार महिन्यांपासून पगार शिक्षकांना उशिराने मिळत आहेत. जिल्ह्यातील किमान दोन तालुक्यांना पगारासाठी पुढील महिन्याची वाट पहावी लागते.

म्हणजेच जिल्ह्यातील एकूण तालुक्यांपैकी दोन तालुके आलटून पालटून दर महिन्याला पगारासाठी वेटिंग वर ठेवले जातात. जानेवारी महिन्याच्या पेमेंट संदर्भात देखील अशीच परिस्थिती आता तयार झाली आहे. जिल्ह्यातील साडेपाच हजार शिक्षकांच्या वेतनासाठी 50 कोटी लागणार होते. मात्र जिल्हा परिषदेकडे अवघे 15 कोटी शिल्लक आहेत.

यामुळे या निधीतून केवळ दोनच तालुक्यांचे वेतन पूर्ण दिल जाणार असून इतर आठ तालुके वेतनासाठी वेटिंगवर राहणार आहेत. एकंदरीत शिक्षकांचे वेतन वेळेवर होत नसल्याने शिक्षकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकांचे बँकेचे हप्ते थकले आहेत.

त्यामुळे लवकरात लवकर वेतनासाठी पुरेसा निधी शासनाने उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शिक्षकांकडून जोर धरू लागली आहे. दरम्यान आता शिक्षकांच्या या मागणीकडे शासनाकडून गांभीर्याने लक्ष घातलं जातं का आणि शिक्षकांचे वेतन वेळेत होतं का हे विशेष पाहण्यासारखं राहणार आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts