स्पेशल

State Employee News : महाराष्ट्रातील ‘त्या’ कर्मचाऱ्यांच्या वेतनाची तारीख पुन्हा लांबली

State Employee News : एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना गेल्या काही महिन्यांपासून वेळेवर वेतन मिळत नसल्याचे सांगितले जात आहे. यामुळे कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. वेळेवर वेतन मिळत नसल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आहे. दरम्यान या महिन्यातही वेतनाची तारीख हुकली आहे.

खरं पाहता एसटी महामंडळातील सर्व कर्मचाऱ्यांना 7 जानेवारी रोजी पेमेंट होत असते. कोरोनापूर्वी तर 7 जानेवारीलाच होत होते. मात्र कोरोना पासून एसटीचे बजेट कोलमडलं असल्याने एसटी कर्मचाऱ्यांना पगारासाठी आता शासनाच्या मदतीवर अवलंबून राहावे लागत आहे.

दरम्यान शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांनी जो मागे मोठा संप पुकारला होता त्यावेळी न्यायालयात एसटी कर्मचाऱ्यांचे पुढील चार वर्ष वेतनाचा निधी वेळेवर पुरवला जाईल असं सांगितल होत.

मात्र, शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. या महिन्यातील वेतनासाठी देखील शासनाकडून अजून निधी मिळणार नसल्याचे सांगितले गेले आहे. यामुळे एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे पुन्हा एकदा वेतन लांबणीवर पडणार असल्याचे चित्र आहे.

दरम्यान आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की एसटीचे प्रत्येक महिन्याचे उत्पन्न 435 कोटींच्या आसपास आहे. मात्र एसटी महामंडळाची संपूर्ण यंत्रणा चालवण्यासाठी साडेसहाशे कोटींचा निधी आवश्यक असतो. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 310 कोटी लागतात.

डिझेल साठी अडीचशे कोटी आणि इतर गोष्टींसाठी 90 कोटींचा निधी हा लागत असतो. अशा परिस्थितीत उर्वरित निधी उपलब्ध करण्यासाठी महामंडळाला शासनावर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र, शासनाकडून वेळेवर निधी पुरवला जात नसल्याने एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे पेमेंट वेळेवर होत नसल्याचे चित्र आहे.

विशेष म्हणजे, कर्मचाऱ्यांचा पीएफ आणि ग्रॅज्युएटीचा पैसा देखील ट्रस्टमध्ये मागे जमा झाला नव्हता. यामुळे निश्चितच महामंडळातील कर्मचारी संकटात असल्याचे चित्र आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts