State Employee News : केंद्रीय कर्मचाऱ्यांना तीन टक्के महागाई भत्ता वाढ मिळाली आहे. आधी केंद्र कर्मचाऱ्यांना 50 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात होता. आता मात्र हा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता लागू करण्यात आला असून ही वाढ जुलै महिन्यापासून लागू झाली आहे.
दरम्यान आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवरच राज्य कर्मचाऱ्यांना देखील जुलै महिन्यापासून तीन टक्के महागाई भत्ता वाढ मिळायला हवी अशी मागणी जोर करत आहे. राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील 53% करावा अशी मागणी राज्य कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आली आहे.
सध्या आचारसंहिताचा काळ सुरू आहे. त्यामुळे राज्य शासन असा निर्णय घेऊ शकत नाही असे काही जाणकारांचे म्हणणे आहे. दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी महागाई भत्ता वाढ लागू करण्यासाठी आचारसंहितेचा कुठलाच अडसर ठरत नसल्याचा दावा केला आहे.
त्यामुळे याबाबतचा निर्णय आचारसंहितेच्या काळात होईल का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. अशी परिस्थिती असतानाच राज्यातील एसटी महामंडळ अंतर्गत कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
एस टी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर एसटी कर्मचाऱ्यांना यावेळी दिवाळी बोनस म्हणून सहा हजार रुपयांची रक्कम मिळू शकते असा दावा केला आहे.
एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षी दिवाळी बोनस म्हणून 5000 ची रक्कम मिळाली होती. यावेळी मात्र ही रक्कम 1000 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे एसटी महामंडळाने यासाठी शासनाकडे 65 कोटी रुपयांची मागणी केली आहे.
कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्यासाठी सुमारे ६५ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र जर या प्रस्तावावर सरकारने सकारात्मक निर्णय घेतला तर एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून सहा हजार रुपये मिळणार आहेत.
यामुळे या सदर नोकरदार मंडळीची दिवाळी आनंदात साजरा होणार आहे. तथापि दीपोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र अजूनही या सानुग्रह अनुदानाबाबत निर्णय झालेला नाही यामुळे सदर कर्मचाऱ्यांमध्ये सरकार विरोधात नाराजी वाढत आहे.