State Employee News : राज्यातील राज्य कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करावे यासाठी मागणी करत आहेत. या सोबतच राज्य कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन योजनेबाबत देखील वारंवार सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे. दरम्यान आता काही मीडिया रिपोर्ट मध्ये राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय लवकरच साठ वर्षे केले जाईल असा अंदाज सांगितला जात आहे.
असं झाल्यास निश्चितच राज्य कर्मचाऱ्यांना दोन वर्ष अतिरिक्त सेवा करता येणार आहे. त्यामुळे प्रशासनाला कर्मचाऱ्यांचा अनुभवाचा फायदा होईल यात तीळमात्रही शंका नाही, शिवाय कर्मचाऱ्यांना देखील थोडासा आर्थिक लाभ मिळणार आहे.
दरम्यान, सदर मीडिया रिपोर्ट मध्ये केलेल्या दाव्यानुसार, सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणे ही राज्य कर्मचाऱ्यांची एक मोठी प्रलंबित मागणी आहे. याबाबत राज्य कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या संघटनांकडून वारंवार निवेदने सरकारकडे सादर झाली आहेत. आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की केंद्रीय कर्मचाऱ्यांना साठ वर्षे सेवेचा लाभ देण्यात आला आहे.
विशेष म्हणजे भारतातील एकूण 25 राज्यात 60 वर्षे सेवा करण्याचा लाभ कर्मचाऱ्यांना देऊ करण्यात आला आहे. मात्र महाराष्ट्रात सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षच आहे. देशातील बहुतांशी राज्यात सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे झाले आहे मात्र महाराष्ट्रात करण्यात आलेले नसल्याने राज्य कर्मचाऱ्यांमध्ये सरकारविरोधात रोष आहे.
निश्चितच मीडिया रिपोर्ट मध्ये केलेला दावा खरा ठरला तर राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे होईल. म्हणजेच दोन वर्षे त्यांना अतिरिक्त सेवेचा लाभ मिळेल परिणामी त्यांचा मोठा आर्थिक फायदा होणार आहे आणि प्रशासनाला देखील त्यांचा अनुभवाचा लाभ घेता येणार आहे.
मात्र, याबाबत अजून शासन स्तरावर कोणताच निर्णय घेतला गेलेला नाही, शिवाय मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत देखील सदर मुद्दा उपस्थित झालेला नाही. यामुळे सदर मीडिया रिपोर्ट मध्ये केलेला दावा हा कितपत खरा आहे हे सांगन मुश्कील आहे.
मात्र राज्य कर्मचाऱ्यांकडून सेवानिवृत्तीचे वय वाढवण्यासाठी वारंवार सरकारला निवेदने दिले जात असून यामुळे सरकार दरबारी दबाव बनत आहे हे मात्र नक्की. यामुळे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्यासाठी निश्चितच राज्य सरकार दरबारी विचार होऊ शकतो. मात्र तूर्तास याबाबत अधिकारीक अशी माहिती समोर आलेली नाही.