स्पेशल

शेवटी निर्णय झालाच! शिंदे-फडणवीस सरकारने ‘या’ कर्मचाऱ्यांच्या वेतनात केली मोठी वाढ; 1 एप्रिल पासून वेतन वाढीचा निर्णय लागू

State Employee Payment Increased : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून आपल्या प्रलंबित मागण्या शासनाने मान्य कराव्यात यासाठी आंदोलनाचा मार्ग अवलंबला जात आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी देखील वेतन वाढीचा आपला प्रश्न शासनाने गांभीर्याने घ्यावा म्हणून आंदोलनाचा मार्ग अवलंबला होता.

या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनापुढे अखेर कार राज्य शासनाने मान टेकवली आणि या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला. राज्य शासनाने एक एप्रिल पासून राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या वेतनात वाढ केली आहे.

हे पण वाचा :- आनंदाची बातमी ! ठाणे महानगरपालिकेमध्ये ‘या’ पदासाठी भरती सुरु; थेट मुलाखतीने होणार भरती, पहा डिटेल्स

खरं पाहता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या वेतनात वाढ करावी ही मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून केली जात होती. मात्र शासनाकडून याची दखल घेतली जात नव्हती. परिणामी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी वेतन वाढीसाठी बेमुदत संप पुकारला होता. यां बेमुदत संपामुळे शासन बॅक फुटवर आले होते.

विरोधकांनी देखील या संपाला पाठिंबा दिला होता. यामुळे शासनावर मोठा दबाव तयार झाला. शेवटी शासनाला कर्मचाऱ्यांच्या या मागणीची दखल घ्यावी लागली आणि शिंदे फडणवीस सरकारने एक एप्रिल पासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात वाढ लागू केली.

हे पण वाचा :- पंजाबराव डख कोण आहेत? त्यांच शिक्षण काय, ते काय काम करतात, त्यांचा मोबाईल नंबर काय? वाचा सविस्तर

शासनाच्या या नवीन निर्णयानुसार आता राज्यातील अंगणवाडी सेविका यांना दहा हजार रुपये प्रति महा मानधन मिळणार आहे. मिनी अंगणवाडी सेविका यांना सात हजार पाचशे रुपये प्रतिमहा मानधन मिळणार आहे. तसेच अंगणवाडी मदतनीस यांना साडेपाच हजार रुपये प्रति महिना मानधन मिळणार आहे.

आणि आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की अंगणवाडी सेविकांच्या मानधनात केंद्र आणि राज्याचा वाटा असतो. यामध्ये राज्याचा वाटा 40 टक्के आणि केंद्राचा वाटता 60% असतो. निश्चितच राज्य शासनाने घेतलेला हा निर्णय अंगणवाडी सेविकांसाठी तसेच मदतनिसांसाठी अतिशय दिलासादायक असून या निर्णयाचे स्वागत कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून केले जात आहे. 

हे पण वाचा :- महाराष्ट्रातील ‘या’ भागात वादळी पाऊस आणि गारपीट होणार! भारतीय हवामान विभागाचा गंभीर ईशारा

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts