स्पेशल

राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढणार; जुनी पेन्शन योजनेसह या मागणीवरही शिंदे-फडणवीस सरकार सकारात्मक, पहा….

State Employee Retirement Age : राज्य कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी लढा देत आहेत. 2005 नंतर राज्य शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचाऱ्यांची आहे. यासोबतच ज्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षे आहे त्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करावे अशी देखील कर्मचाऱ्यांची मागणी आहे.

याच मुख्य मागण्यांसाठी नुकत्याच काही दिवसांपूर्वी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून संप करण्यात आला होता. दरम्यान शासनाने संपकरी कर्मचाऱ्यांना मागणीवर सकारात्मक निर्णय घेऊ असा आश्वासन दिल्याने हा संप मोडीत काढण्यात आला आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या मागण्यावर तोडगा काढण्यासाठी एका समितीची देखील स्थापना झाली आहे.

यामुळे आता राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेबाबत आणि सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबत लवकरच गोड बातमी मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. एका मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार राज्य शासन सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यासाठी सकारात्मक आहे.

हे पण वाचा :- पांढऱ्या टरबूज लागवडीचा यशस्वी प्रयोग; 70 दिवसांत अर्ध्या एकरात झाली दीड लाखांची कमाई, कोणत्या जातीची केली लागवड?, पहा….

निश्चितच राज्य शासनाने हा निर्णय घेतला तर राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. वास्तविक केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे आहे. तसेच राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या वर्ग ड मधील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय देखील 60 वर्षे आहे. मात्र जे कर्मचारी अ, ब आणि क या संवर्गात काम करत आहेत त्यांना सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षे आहे. यामुळे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय सरसकट 60 वर्षे केले जावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचारी करत आहेत.

दरम्यान आता यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. आगामी वर्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार असल्याने यावर शासनाकडून सकारात्मक निर्णय घेण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षेच असल्याने राज्य कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती वय 60 वर्षे करण्यास शासन सकारात्मक असल्याचे सांगितले जात आहे.

हे पण वाचा :- पुण्याच्या शेतकऱ्याचा नादच खुळा! खडकाळ माळरानावर फुलवली द्राक्षाची बाग; 11 एकरात मिळवला तब्बल 75 लाखाचा निव्वळ नफा, पहा…

निश्चितच हा जर निर्णय घेतला गेला तर राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. यामुळे राज्य शासनाला देखील फायदा होईल आणि कर्मचाऱ्यांचा अनुभवाचा वापर करता येईल असा दावा तज्ञ लोक करत आहेत. वास्तविक अनेक खाजगी कंपन्यांमध्ये कर्मचारी वयाची 65 वर्षेपर्यंत काम करतात, तसेच खाजगी कंपन्या शासकीय सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर आपल्या कंपनीत विशेष स्थान देखील देत असतात.

अशा परिस्थितीत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे वय वाढवून अशा कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा वापर शासनानेही केला पाहिजे अशी मागणी कर्मचाऱ्याची आहे. दरम्यान आता शासनही यावर सकारात्मक असल्याचे सांगितले जात आहे. एकंदरीत यावर जर काही सकारात्मक निर्णय झाला तर कर्मचाऱ्यांना दोन वर्ष अधिक सेवा देता येणार आहे आणि यामुळे त्यांना मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा :- राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार नाही; पण OPS मधील ‘या’ तरतुदी लागू केल्या जातील, पहा….

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts