स्पेशल

आताची सर्वात मोठी बातमी ! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ झाली; मे महिन्याच्या वेतनासोबतच मिळणार लाभ, शासन निर्णय निघाला

State Government Employee News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील सरकारी कर्मचाऱ्यासंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज्य शासकीय सेवेतील काही संवर्गातील सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे.

महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अखिल भारतीय सेवेतील अधिकारी तसेच निवृत्तीवेतनधारकांना आता चार टक्के महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे. आज अर्थातच 29 मे 2023 रोजी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने या संदर्भात एक महत्त्वाचा जीआर अर्थात शासन निर्णय निर्गमित केला आहे.

हे पण वाचा :- मोठी बातमी ! मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट दर जाहीर; केव्हापासून धावणार, कुठं राहणार थांबा? वाचा…..

या शासन निर्णयानुसार आता महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अखिल भारतीय सेवेतील अधिकारी तसेच निवृत्तीवेतनधारकांना आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना चार टक्के महागाई भत्ता अर्थातच डीए वाढीचा लाभ मिळणार आहे. हा सदरील लाभ जानेवारी 2023 पासून संबंधित कर्मचाऱ्यांना अनुज्ञय केलेला आहे.

मात्र याचा रोखीने लाभ पुढील महिन्यात मिळणार आहे. म्हणजे या महागाई भत्ता वाढीचा लाभ मे महिन्याच्या वेतनासोबत संबंधित कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. अर्थातच जानेवारी महिन्यापासून ते एप्रिल महिन्यापर्यंतची महागाई भत्ता थकबाकी देखील या संबंधित कर्मचाऱ्यांना मे महिन्याच्या वेतनासोबत आणि पेन्शन सोबत देऊ केली जाणार आहे.

हे पण वाचा :- दहावी, बारावी उत्तीर्ण तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! सशस्त्र सीमा दलात ‘या’ जागांसाठी निघाली मोठी भरती, आजच करा अर्ज

आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना आतापर्यंत 38 टक्के दराने महागाई भत्ता मिळत होता. आता चार टक्के यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थातच आता या संबंधित कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता अनुज्ञय राहणार आहे.

दरम्यान, अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना आणि निवृत्ती वेतन धारकांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला असल्याने सर्वच राज्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ केव्हा मिळणार? हा देखील प्रश्न या निमित्ताने कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे.

हे पण वाचा :- ‘हा’ स्टॉक ठरला शेअर मार्केटचा बादशाह ! ‘इतक्या’ वर्षातच गुंतवणूकदाराचे 60 हजाराचे बनवलेत 10 कोटी, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आली फळाला

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts