स्पेशल

महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात होणार तब्बल 8% वाढ? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे घेणार मोठा निर्णय

State Government Employee News : महाराष्ट्र राज्यातील जवळपास 18 लाख सरकारी कर्मचाऱ्यांसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की केंद्र शासनाने जानेवारी महिन्यापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना चार टक्के डीए वाढीचा लाभ दिला आहे.

सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे. आधी हा भत्ता 38% इतका होता. विशेष बाब म्हणजे केंद्र शासनाच्या या निर्णयानंतर अनेक राज्यांनी देखील त्यांच्या राज्य कर्मचाऱ्यांच्या हितासाठी महागाई भत्ता वाढवला आहे.

यामध्ये गुजरात राज्य सरकारने तब्बल आठ टक्के महागाई भत्ता वाढवला आहे. मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार गुजरात राज्य शासनाने तेथील कर्मचाऱ्यांचा जुलै 2022 पासूनचा 4% आणि जानेवारी 2023 पासूनचा 4% असा 8% महागाई भत्ता वाढवला आहे.

हे पण वाचा :- मिसिंग लिंकमुळे मुंबई ते पुणे प्रवास होणार सुसाट, प्रवाशांच्या अर्धा तासाचा वेळ वाचणार; प्रकल्पाचे काम केव्हा होणार पूर्ण ? MSRDC अधिकारी म्हणतात….

दरम्यान आता महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना देखील आठ टक्के महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य शासन राज्य कर्मचाऱ्यांचा जानेवारी 2023 पासूनचा 4% आणि जुलै 2023 पासूनचा 4 टक्के असा एकूण आठ टक्के डीए वाढवणार आहे. यासंदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून कोणतीच अधिकारीक अपडेट हाती आलेली नाही.

मात्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खुश करण्यासाठी जानेवारी 2023 पासूनची 4% डी ए वाढ आणि जुलै 2023 पासूनची 4% डीए वाढ देण्याचा निर्णय शिंदे सरकार घेऊ शकते असा दावा केला जात आहे. निश्चितच राज्य शासनाने हा निर्णय घेतला तर राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 46% एवढा होणार आहे.

हे पण वाचा :- काय सांगता ! फक्त 3 वर्षात ‘या’ स्टॉकने दिलेत 1500% रिटर्न्स, 1 लाखाचे बनलेत 17 लाख; कोणता आहे हा शेअर, वाचा….

यामुळे संबंधितांच्या वेतनात मोठी वाढ होणार आहे. दरम्यान, राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासून चार टक्के महागाई भत्ता वाढवण्याचा प्रस्ताव वित्त विभागाकडून तयार झाल्याची माहिती एका मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.

तसेच याचा लाभ जून महिन्याच्या वेतनासोबत दिला जाणार आहे अर्थातच जुलै महिन्यात जें पेमेंट मिळेल त्यासोबत याचा रोखीने लाभ कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे. विशेष म्हणजे जून महिन्याच्या वेतनासोबत तसेच पेन्शन सोबत महागाई भत्ता थकबाकीची रक्कम देखील कर्मचाऱ्यांना मिळणार असल्याचे सांगितले गेले आहे.

यामुळे आता शिंदे सरकार एकदाच आठ टक्के महागाई भत्ता वाढवते की आधी 4% आणि त्यानंतर 4% महागाई भत्ता वाढवते हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.

हे पण वाचा :- अहमदनगर, नासिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, अन ‘या’ जिल्ह्यात 29 आणि 30 मे ला पाऊस पडणार ! तुमच्या भागात कसं राहणार हवामान? पहा…

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts