Success Story : अलीकडे महाराष्ट्रातील प्रयोगशील शेतकरी शेतीमध्ये मोठा बदल करत आहेत. वेग-वेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी बांधव लाख रुपयांची कमाई करत आहेत. केवळ पारंपारिक पिकावर अवलंबून न राहता आता हंगामी पिकांची शेती शेतकऱ्यांच्या माध्यमातून केली जात आहे. फुल शेती देखील अलीकडे राज्यात मोठी वाढली आहे.
सांगली जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने देखील गुलाब फुलशेतीच्या माध्यमातून लाखो रुपयांची कमाई करून दाखवली आहे. खरं पाहता अलीकडे सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुलाब फुल शेती होऊ लागली आहे. विशेष बाब अशी की जिल्ह्यातील गुलाब आता देशातील कानाकोपऱ्यात विक्रीसाठी जात आहेत.
त्यामुळे शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळत असून व्हॅलेंटाइन मध्ये प्रेमाचं प्रतीक ठरणार हे गुलाब आता शेतकऱ्यांच्या जीवनातही आनंद भरत आहे. गुलाबाची मागणी ही व्हॅलेंटाईन डे तसेच लग्न समारंभात मोठ्या प्रमाणात असते अशा परिस्थितीत या पिकाची शेती करून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न अलीकडे मिळू लागल आहे. दरम्यान जिल्ह्यातील सोनी पाटगाव येथील शेतकरी नंदकुमार माळी यांनी देखील गुलाब लागवडीचा प्रयोग केला आहे.
या प्रयोगशील शेतकऱ्याने आपल्या दोन्ही एकर शेती जमिनीत गुलाबाची शेती फुलवली आहे. विशेष म्हणजे सोनी पाटगाव व आजूबाजूच्या परिसरातील वातावरण गुलाब शेतीसाठी पोषक असल्याने या शेतकऱ्याचा प्रयोग यशस्वी झाला असून त्याला या दोन एकर शेत जमिनीत फुलवलेल्या गुलाब शेतीतून लाखोंचे उत्पन्न मिळत आहे. नंदकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार गुलाबाचे उत्पादन साधारणपणे पाच ते सहा महिन्यात हाती येते.
दरम्यान ही गुलाब तयार झाली की कटिंग करून याचीं मिरज या ठिकाणी विक्री केली जाते. मिरज मधील बाजारपेठेत याची विक्री होते आणि येथून हे गुलाब मुंबई, पुणे, दिल्ली, कर्नाटक, गोवा यांसारख्या महत्त्वाच्या बाजारपेठेत विक्री होत असल्याची माहिती माळी यांनी यावेळी दिली. एकंदरीत सांगली येथील गुलाब देशातील कानाकोपऱ्यात विक्रीसाठी अलीकडे जाऊ लागले आहेत.
माळी यांच्या मते त्यांना एक एकर शेत जमिनीतून गुलाब या पिकातून महिन्याकाठी 50 हजाराचे उत्पन्न मिळत आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार व्हॅलेंटाईन डे च्या पिरेडमध्ये या फुलाला मोठी मागणी असते आणि याच कालावधीत यातून मोठा पैसा देखील त्यांना मिळतो. निश्चितच, गुलाबाची शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत असून माळी यांनी केलेला हा प्रयोग इतरांसाठी मार्गदर्शक राहणार आहे.