स्पेशल

Success Story: पती-पत्नीच्या ‘या’ नावीन्यपूर्ण स्टार्टअपमध्ये रतन टाटांनी केली गुंतवणूक! 70 हजार प्रतिमहिना कमाई पोहोचली 2 कोटीपर्यंत

Success Story:- कुठलाही व्यवसाय सुरू करण्या अगोदर त्या व्यवसायाची कल्पना किंवा त्या व्यवसायाचा आराखडा अगोदर आपल्या मनामध्ये येतो व त्यानंतर तो प्रत्यक्षात उतरण्यासाठी लागणारी कष्ट व मेहनत घेतली तर तो व्यवसाय उभा राहतो. आजकालचे तरुण-तरुणींचा विचार केला तर त्यांच्या मनामध्ये अनेक नावीन्यपूर्ण अशा कल्पना असतात.

आता गरज असते त्या कल्पनांना वास्तव स्वरूप देण्याकरिता आवश्यक असलेल्या प्रयत्नांची. अशा नाविन्यपूर्ण कल्पनांच्या आधारावरच आज अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्म किंवा स्टार्टअप कंपन्या उभ्या राहिल्या असून त्यामध्ये आपल्याला स्विगी आणि झोमॅटो सारख्या फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्यांचा विचार करावा लागेल.

परंतु यासारखाच जर तुमच्यासाठी घरपोच पेट्रोलचे डिलिव्हरी करेल तर कसे होईल? हो अगदी याच पद्धतीने आदिती आणि चेतन वाळुंज या दांपत्याने घरपोच पेट्रोल पोहोचवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असून त्यांच्या या स्टार्टअपने उत्तुंग भरारी घेतली आहे. त्यांच्या स्टार्टअप विषयी आपण माहिती घेणार आहोत.

 अशी केली रेपोस एनर्जीची सुरुवात

याबद्दल सविस्तर वृत्त असे की, चेतन आणि आदिती वाळुंज या दांपत्याने पुणे येथे रेपोर्स एनर्जी ही स्टार्टअप कंपनी सुरू केली असून ती आता भारतामध्ये 65 शहरात घरोघरी इंधन वितरण करत असून ऑनलाइन पेमेंट आणि इतर स्वरूपांना देखील परवानगी देते. जर या कंपनीच्या सुरुवातीची कहाणी पाहिली तर आदिती यांच्या पालकांनी त्यांना अरेंज मॅरेज करण्यास सांगितले होते आणि लग्न करण्याची कुठलीही इच्छा नसताना आदिती आणि चेतन यांची भेट झाली.

या भेटीत ते एकमेकांना आवडले व त्यांनी लग्न केले. चेतन हा मेकॅनिकल इंजिनियर होता व आदितीला आपले उच्च शिक्षण अमेरिकेत घ्यायचे होते. परंतु आदितीने हे स्वप्न बाजूला सारले व एकसमान ध्येय समोर ठेवून स्वतःची स्टार्टअप कंपनी सुरू करण्याचे ठरवले. या विचारातूनच त्यांना ग्राहक आणि कंपन्यांना दारातच पेट्रोल पुरवण्याची संकल्पना सुचली व त्यातून रेपोस एनर्जीचे सुरुवात झाली.

जेव्हा सुरुवात झाली तेव्हा त्यांचा प्रत्येक महिन्याला मिळणारा नफा 70 हजार रुपये होता. परंतु त्यांचा हा व्यवसाय आणि त्यांची कल्पना प्रसिद्ध झाली व हा व्यवसाय रतन टाटा यांच्या लक्षात आला व त्यांचे लक्ष वेधले गेले. त्यानंतर रतन टाटा यांनी त्यांच्या रेपोस एनर्जी फर्म या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याचे ठरवले व त्यांनी गुंतवणूक केली व त्यानंतर रेपोस एनर्जीने खूप मोठी भरारी घेतली.

प्रत्येक महिन्याला 70 हजार रुपये कमावणारी ही कंपनी आता 2.2 कोटी रुपये कमाई करत आहे. मागच्या वर्षी या दांपत्याने 65 कोटी रुपयांची उलाढाल केली. जर आपण या कंपनीची किंमत पाहिली तर ती 200 कोटींपेक्षा अधिक आहे व रतन टाटा समर्थीत फर्मने लार्सन अँड टुब्रो, टाटा समूह तसेच महिंद्रा अँड महिंद्रा, जेडब्ल्यू मॅरियट हॉटेल, फिनिक्स मॉल तसेच वेस्टीन हॉटेल  यासारख्या मोठ्या कंपन्यांसोबत प्रकल्पांवर स्वाक्षरी केली असून या पुढच्या काळात या कंपनीचा व्यवसाय आणखी वाढेल हे मात्र नक्की.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts