Surat Chennai Greenfield Expressway : महाराष्ट्रात सध्या महामार्गाची कामे जोमात सुरू आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या विकासाला मोठी गती लाभणार आहे. खरं पाहता नुकत्याच काही दिवसांपूर्वी भारतातील सर्वात लांब महामार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गाचे उद्घाटन झाले आहे.
या महामार्गाचे पहिल्या टप्प्यातील काम म्हणजेच नागपूर ते शिर्डी हे काम पूर्ण झाले असून सर्वसामान्यांसाठी हा रूट खुला करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या बहुचर्चित महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करकमलाद्वारे झाले आहे. दरम्यान आता महाराष्ट्रासाठी समृद्धी महामार्गप्रमाणेच महत्वाच्या अशा सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे बाबत एक मोठी माहिती हाती आली आहे.
खरं पाहता गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांनी नाशिकमध्ये काही विकास कामांचा शुभारंभ केला तर काही रस्त्यांचे लोकार्पण केले. यावेळी त्यांनी नाशिक जिल्ह्यात 122 किलोमीटर लांबीचे अंतर असणाऱ्या सुरत चेन्नई महामार्गाबाबत एक माहिती दिली आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या बहुमूल्य माहितीनुसार, हा महामार्ग 80 हजार कोटी रुपये खर्चून विकसित केला जात आहे.
विशेष म्हणजे एकट्या नाशिक जिल्ह्यात या महामार्गासाठी दहा हजार कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. या महामार्गामुळे देशातील काही औद्योगिकदृष्ट्या महत्वाची शहरे एकमेकांशी जोडली जाणार आहेत. यामुळे सुरत ते चेन्नई हे अंतर अवघ्या दहा तासात पार करता येणे शक्य होणार असून यामुळे देशाच्या विकासाला गती लाभणार आहे. यामुळे कृषी क्षेत्राला, उद्योग जगताला पर्यटनाला मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत.
या महामार्गामुळे नाशिकच्या वाहतुकीला चालना मिळणार आहे. या महामार्गासाठी आवश्यक जमीन मोजणी हेतू डिसेंबर मध्ये अधिसूचना जारी होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की हा महामार्ग जिल्ह्यातील सुरगाणा, पेठ, दिंडोरी, नाशिक, निफाड आणि सिन्नर या तालुक्यांतल्या 69 गावांतून जाणार आहे. जिल्ह्यात याची लांबी 122 किलोमीटर राहणार असून 997 हेक्टर शेत जमिनीवर भूसंपादन होणार आहे.
या महामार्गाची एकूण लांबी 1250 किलोमीटर असून राज्यात याची लांबी 422 किलोमीटर आहे. महाराष्ट्रात एकूण 4200 हेक्टर शेत जमिनीचे भूसंपादन या महामार्गासाठी केलं जाणार आहे. या प्रस्तावित महामार्गामुळे सुरत, अहमदनगर, सोलापूर, हैदराबाद, चेन्नई ही महत्त्वाचे शहरे परस्परांशी जोडली जाणार आहेत.
त्यामुळे या शहरांमधील प्रवास अजूनच सोयीस्कर होणार आहे. दरम्यान या महामार्गाचे अहमदनगर जिल्ह्यातील भूसंपादन हे अंतिम टप्प्यात आले आहे. भूसंपादनानंतर पुढील तीन वर्षात या महामार्गाचे काम होणार आहे. असं सांगितले जात आहे की, लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन सरकार लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच या महामार्गाच उदघाट्न करण्यासाठी ईच्छुक आहे.
या महामार्गाची अजून एक मोठी विशेषता म्हणजे हा महामार्ग सिन्नर येथील वावी या ठिकाणी समृद्धी महामार्गाला जोडणार आहे. हा मार्ग गुजरात मधून सुरगाणा तालुक्यातील राक्षस भवन या ठिकाणी प्रवेश करतो आणि अक्कलकोट हे महाराष्ट्रातील या मार्गाच शेवटच टोक आहे.
नाशिक जिल्ह्यातील या गावातून जाणारा हा मार्ग
सुरगाणा तालुक्यातील या गावातून जाणार – बेंडवाज, बहुदा, दुधवळ, गहाळे, रक्षाभुवन, हाते, जाहुले, कहांडोळसा, कोटंबा, मर्दंड, पिंपळचोंद, सांबरखाल.
दिंडोरी तालुक्यातील या गावातून जाणार – तेतमाळा, रडतोंडी, कवडसर, चिल्हारपाडा, महाजे, चाचडगाव, उमराळे बुद्रुक, जांबुटके, नालेगाव, इंदोरी, रशेगाव, ननाशी, पिंपळनेर, रामशेज, आंबेदिंडोरी, ढाकंबे, शिवनई, वरवंडी, गांडोळे, आंबोळेगाव, बाडलेगाव, बाडपेठ.
पेठ तालुक्यातील यां गावातून जाणार – पाहुचीबारी, विरमळ, कळंबरी, वडबारी, हरणगाव.
नाशिक तालुक्यातील यां गावातून जाणार – आडगाव, ओढा, विंचुरगवली, लाखलगाव.
निफाड तालुक्यातील यां गावातून जाणार – चेहेडी खुर्द, चाटोरी, वऱ्हे, लालपाडी, रामनगर, दारणासांगवी, सावली, तळवडे, पिंपळगाव निपाणी.
सिन्नर तालुक्यातील यां गावातून जाणार :- देशवंडी, पाटपिंप्री, निमगाव देवपूर, बारागाव पिंपरी, गुळवंच, देवपूर, खोपडी बुद्रुक, धरणगाव, फर्दापूर, पांगरी बुद्रुक, भोकणी, पांगरी खुर्द, फुलेगणर, कहांडळवाडी, घोटेवाडी, वावी.