स्पेशल

सणासुदीचा फायदा उठवा आणि यामाहाच्या बाईक्स वर मिळवा भरपूर सवलत! 7999 च्या डाउनपेमेंटने न्या घरी, होईल मोठी पैशांची बचत

गणपती उत्सवापासून देशात सणासुदीला सुरुवात झाली असून या कालावधीमध्ये तुम्हाला देखील बाईक घ्यायची असेल व या हंगामाचा फायदा घेऊन पैसा वाचवायचा असेल तर अनेक बाईक उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून सवलतीच्या ऑफर जारी करण्यात आलेले आहेत.

या कंपन्यांमध्ये यामाहा इंडियाने देखील त्यांच्या काही बाईकवर सवलतीच्या ऑफर जारी केल्या असून यामध्ये कंपनीने यामाहा FZ सिरीज आणि 125cc Fi हायब्रीड स्कूटर वर सूट दिली असून या सणासुदीच्या कालावधीमध्ये जर तुम्हाला बाईक किंवा स्कूटर घ्यायचे असेल तर यामाहा इंडियाच्या या ऑफरबद्दल तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे.

कंपनीने 150 सीसी FZ मॉडेल रेंज आणि 125cc Fi हायब्रीड स्कूटरस वर ऑफर जारी केलेली आहे. इतकेच नाही तर कंपनीच्या माध्यमातून या बाईक खरेदीवर आता लो डाऊन पेमेंटची सुविधा देखील देण्यात आलेली आहे.

कोणत्या मॉडेल्स वर सवलत उपलब्ध आहे?

कंपनीने FZ-s Fi Ver 4.0,FZ-S Fi Ver 3.0,FZ Fi वर सात हजार रुपये पर्यंतचा कॅशबॅक आणि 7999 रुपयाचे डाऊन पेमेंट मध्ये उपलब्ध आहेत. असेच तुम्ही यामाहा कंपनीची स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर यामाहा फॅसिनो 125 एफआय हायब्रीड आणि RayZR 125 एफआय हायब्रीडवर 4000 पर्यंत कॅशबॅक आणि 2999 पर्यंतचे डाऊन पेमेंटमध्ये उपलब्ध आहे.

 यामाहाच्या RayZR 125 ट्रीट रॅलीच्या नवीन एडिशनमध्ये आंसर बॅक आणि एलईडी डीआरएलचा पर्याय देखील देण्यात आलेला आहे व या स्कूटरची एक्स शोरूम किंमत 98 हजार 130 रुपये आहे.

कंपनीने या स्कूटर मध्ये 125cc  Fi ब्लू कोर इंजिन आणि हायब्रीड पावर असिस्ट देखील दिला आहे. याशिवाय या स्कूटरमध्ये एअर कुल्ड, फ्युएल इंजेक्टेड इंजिन दिले असून ते स्मार्ट मोटर जनरेटरसह येते

स्टोरेज बद्दल बोलायचे झाले तर यामध्ये 21 लिटर बूट स्पेस, फ्रंटला टेलिस्कोपिक सस्पेन्शन, साईड स्टॅन्ड इंजिन कट ऑफ स्विच, ऑटोमोबाईल स्टॉप आणि स्टार्ट सिस्टम आणि पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर सारखे वैशिष्ट्ये देण्यात आलेली आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts