Important Vastu Tips:- प्रत्येकाच्या जीवनामध्ये ज्याप्रमाणे ज्योतिष शास्त्र आणि अंकशास्त्र यांचे महत्त्व आहे अगदी त्याचप्रमाणे वास्तुशास्त्र देखील खूप महत्त्वाचे असल्याचे मानले जाते. कुठल्याही काम करण्याअगोदर त्यात सांगितलेल्या नियमांचे पालन केले तर त्याचे खूप चांगले आणि सकारात्मक परिणाम आपल्याला पाहायला मिळतात.
अगदी हीच बाब वास्तुशास्त्राच्या बाबतीत देखील लागू होते. आपल्याला माहित आहे की वास्तुशास्त्रामध्ये घराचे बांधकाम किंवा नवीन घर खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी किंवा घरामध्ये कोणती गोष्ट कुठे ठेवावी आणि कोणत्या गोष्टी ठेवू नयेत? याबाबत देखील महत्त्वाचे नियम आहेत व हे नियम पाळणे देखील तितकेच गरजेचे आहे.
अगदी याच प्रमाणे आपण वास्तुशास्त्रात सांगितलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी जर बघितल्या व त्या गोष्टीनुसार अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या घरात ठेवणे चांगले नसते किंवा त्या पटकन घराच्या बाहेर टाकून देणे फायद्याचे ठरते याबद्दलची माहिती बघणार आहोत. जेणेकरून यामुळे तुम्हाला कधीही आर्थिक संकटांचा सामना करावा लागणार नाही.
घरामध्ये असतील या गोष्टी तर पटकन घराच्या बाहेर काढा
1- जुन्या आणि निरुपयोगी वस्तू- तुम्हाला जर पैशाशी संबंधित समस्यांपासून दूर राहायचे असेल व तुमच्याकडे पैसा राहावा असे वाटत असेल तर नवीन वर्षाच्या आधी घरातून जुने आणि निरुपयोगी वस्तू फेकून देणे गरजेचे आहे.
यामध्ये जर फाटलेले शूज तसेच चप्पल, कपडे, खराब झालेले घड्याळे किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील तर नवीन वर्षाच्या आधी या सर्व गोष्टी घरातून काढून टाकणे फायद्याचे ठरेल. तसेच महत्त्वाचे म्हणजे घरामध्ये अशा गोष्टी नसतील तर घरात लक्ष्मीचा वास राहील.
2- तुटलेले पुतळे/ मूर्ती आणि फाटलेली पुस्तके- वास्तुशास्त्रानुसार बघितले तर तुमच्या घरामध्ये देवाच्या तुटलेल्या मूर्ती किंवा फाटलेली धार्मिक पुस्तके असतील तर अशी पुस्तके घरात ठेवू नयेत.
अशा वस्तू घरापासून लवकरात लवकर दूर कराव्यात. दुसरे म्हणजे अशा गोष्टी इकडे तिकडे फेकण्यापेक्षा पाण्यात बुडवणे चांगले मानले जाते.
3- सुकलेली झाडे- वास्तुशास्त्रामध्ये बघितले तर सुकलेली झाडे घरात ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे व हे अत्यंत शुभ मानले गेले आहे. जर तुम्ही तुमच्या घरात सुकलेली रोपे ठेवली तर त्याचे खूप नकारात्मक परिणाम होतात.
जर तुमच्या घराच्या बागेत किंवा घरात कुंड्यांमध्ये अशा प्रकारची झाडे असतील तर नवीन वर्षाच्या आधी त्यांना घरातून काढून टाकणे गरजेचे आहे व त्या जागी नवीन रोपांची लागवड करावी.
4- तुटलेली काच- तुमच्या घरात तुटलेली काच किंवा काचेची कोणतीही वस्तू ठेवली असेल तर नवीन वर्षाच्या आधी घराबाहेर फेकून द्यावी. तुटलेली काच अशुभ मानली जाते. जर तुमच्या घरामध्ये अशा तुटलेल्या काचेच्या वस्तू असतील तर त्यामुळे कुटुंबात भांडणे होतात. तसेच या कारणांमुळे आर्थिक संकटांचा सामना देखील करावा लागू शकतो.