स्पेशल

Tata Tiago CNG vs Maruti Swift CNG: दोन्हीपैकी कोणती सीएनजी कार राहील सर्वात चांगली आणि पावरफुल? वाचा किंमत आणि फीचर्स

Tata Tiago CNG vs Maruti Swift CNG:- कार किंवा बाईक खरेदी करायची असेल तर आता ग्राहकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर चोखंदळपणा असल्याचे आपल्याला दिसून येते. एखादा ग्राहक जर बाजारामध्ये कार खरेदी करायला गेला तर कारची निवड करताना कमी किमतीमध्ये जास्तीत जास्त चांगली फीचर्स असलेली कारची निवड करण्यासाठी प्रयत्नशील असतो.

दुसरे महत्वाचे म्हणजे आता जर आपण परिस्थिती पाहिली तर पेट्रोल आणि डिझेल यांच्या वाढत्या किमतींमध्ये बरेच ग्राहक कार खरेदी करताना सीएनजी कारकडे वळतांना आपल्याला दिसून येत आहे व त्या खालोखाल आता इलेक्ट्रिक कार खरेदीकडे देखील ग्राहकांचा ट्रेंड दिसून येत आहे.

सीएनजी कारच्या दृष्टिकोनातून बघितले तर भारतीय कार बाजारपेठेमध्ये अनेक सीएनजी हॅचबॅक कारची मागणी वाढताना दिसून येत आहे व त्यामुळे अनेक कार उत्पादक कंपन्यांनी देखील कारची वेगवेगळे सीएनजी मॉडेल बाजारात आणलेले आहेत.

यातील जर आपण बघितले तर  मारुती स्विफ्ट सीएनजी आणि टियागो सीएनजी या ग्राहकांमध्ये पसंतीच्या  असलेल्या कार म्हणून ओळखले जातात. त्यामुळे या दोन्ही सीएनजी कारपैकी कोणती कार ही  सर्वात फायद्याची किंवा चांगली ठरेल, याबद्दलची तुलनात्मक  माहिती थोडक्यात जाणून घेणारा.

 स्विफ्ट सीएनजी आणि टाटा टियागो सीएनजी मधील मायलेज आणि स्पेसिफिकेशन

 मारुती सुझुकी स्विफ्ट सीएनजी मारुती स्विफ्ट सीएनजीमध्ये 1.2- लिटर,3- सिलेंडर तसेच N/A इंजिन देण्यात आले असून हा सीएनजी व्हेरियंट ५७०० आरपीएमवर 69 बीएचपी आणि 2900 आरपीएम वर 101.8 एनएम टॉर्क जनरेट करते. हे पाच स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह येते. यामध्ये मारुती सुझुकी कंपनी दावा करते की नवीन स्विफ्ट सीएनजी ही 32.85 किमी/ प्रति किलो इतके मायलेज देण्यासाठी सक्षम आहे.

2- टाटा टियागो सीएनजी टियागो ही 5 मॅन्युअल ट्रीम्स आणि चार एएमटी प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. याला 6000 rpm वर 72 बीएचपी आणि तीन हजार पाचशे आरपीएम वर 95 एनएम टॉर्कसह 1.2-लिटर N/A इंजिन देण्यात आलेले आहे. तसेच हे पाच स्पीड मॅन्युअल किंवा पाचच स्पीड एएमटीशी जोडलेले आहे. तसेच मायलेज बघितले तर एएमटी करिता 26.49 कीमी प्रतिकिलो आणि 28.06 किमी प्रतिकिलो मायलेज देते.

 दोन्ही सीएनजी कारमधील फीचर्स आणि त्यांच्या किमती

1- मारुती स्विफ्ट सीएनजी या कारमध्ये कंपनीने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सहा एअरबॅग, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम+, हिल होल्ड असिस्ट, पार्किंग सेन्सर्स आणि एबीएस आणि ईबीडी सारखी सेफ्टी फीचर्स दिलेली आहेत.

हे स्वयंचलित हवामान नियंत्रण, रेअर एसी वेंट, एक वायरलेस चार्जर,60: 40 प्लेट रेअर सीट्स आणि एप्पल कार प्लेसह सात इंचाचा इन्फोटेनमेंट सिस्टम आणि अँड्रॉइड ऑटो आणि कनेक्टेड टेक्नॉलॉजी देखील देण्यात आलेली आहे. या कारला 55 लिटर क्षमतेचा सिंगल सीएनजी सिलेंडर मिळतो.

2- टाटा टियागो सीएनजी टाटा टियागो सीएनजी कारचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही पहिली हॅचबॅक कार आहे ज्यामध्ये दुहेरी सीएनजी सिलेंडर मिळते. जी थेट सीएनजी मोडमध्ये सुरू करता येणे शक्य आहे.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या कारला ग्लोबल एनसीएपी सेफ्टी रेटिंगमध्ये चार स्टार प्राप्त झालेले आहे. या कारमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून दोन एअरबॅग्स, EBD आणि कॉर्नर स्टॅबिलिटी कंट्रोलसह

ABS, EBD सह आणि ABS आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम देण्यात आलेली असून यामध्ये सात इंचाच्या इन्फोटेनमेंट सिस्टमसह एप्पल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो, रेन सेन्सिंग वायफर, ऑटोमॅटिक हेडलाईट्स तसेच फॉग लॅम्प आणि रेअर पार्किंग कॅमेरा देण्यात आलेला आहे.

 किती आहे मारुती स्विफ्ट सीएनजीची किंमत?

मारुती सुझुकीने सीएनजी व्हर्जनमध्ये स्विफ्ट लाँच केली असून ज्याची एक्स शोरूम किंमत आठ लाख वीस हजार रुपये इतकी आहे. स्विफ्ट सीएनजी ही VXI सीएनजी, VXI(O) सीएनजी आणि ZXI सीएनजी या तीन वेरियंटमध्ये येते. या कारची टाटा टियागो सीएनजी कारशी थेट स्पर्धा आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts