Teacher Salary In Maharashtra : राज्य शासनाच्या माध्यमातून एक मोठा निर्णय झाला आहे. त्यामुळे राज्यातील तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना मोठा दिलासा मिळणार आहे. जस की आपणास ठाऊकच आहे की, राज्यातील शासकीय महाविद्यालये/ संस्था, अशासकीय अनुदानित महाविद्यालये तसेच अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन व कला महाविद्यालये यामध्ये मंजूर पदे ही सेवानिवृत्ती वा अन्य कारणामुळे रिक्त आहेत.
अशा परिस्थितीत याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो. मात्र या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शासनाकडून एक विशेष योजना राबवली जाते. याच्या माध्यमातून तासिका तत्त्वावर प्राध्यापकांची नियुक्ती करण्याचे प्रावधान आहे. राज्यात हजारो अध्यापकांची तासिका तत्त्वावर नियुक्ती करण्यात आली आहे.
मात्र या प्राध्यापकांना मिळणार मानधन वाढवले जावे अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती. विशेष म्हणजे याबाबत शासनाने नुकतीच मोठी घोषणा देखील केली होती. मात्र याला वित्त विभागाची मंजुरी मिळालेली नव्हती. परंतु शासनाच्या या निर्णयाला आता वित्त विभागाची मंजुरी मिळाली आहे.
याबाबत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी माहिती दिली आहे. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील तासिका तत्त्वावर कार्यरत असलेल्या प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याच्या निर्णयाला वित्त विभागाने मान्यता दिली आहे. पाटील यांनी ही माहिती विधानसभेत निवेदनाच्या माध्यमातून दिली आहे.
आता इतकं मिळणार मानधन
उच्च शिक्षण संचालनालया अंतर्गत येणाऱ्या कला, वाणिज्य, विज्ञान पदवी अभ्यासक्रमाकरिता रु.1 हजार प्रति तास अन पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरिता 1 हजार प्रति तास. तसेच शिक्षणशास्त्र / शारीरिक शिक्षण / विधी (पदवी / पदव्युत्तर) या व्यावसायिक अभ्याक्रमांकरिता 1 हजार प्रति तास इतक मानधन आता तासिका तत्त्वावरील संबंधित प्राध्यापकांना मिळणार आहे.
याशिवाय तंत्र शिक्षण संचालनालया अंतर्गत येणाऱ्या उद्योग व्यवसाय क्षेत्रातून निमंत्रित तज्ज्ञ / अनुभव संपन्न ज्येष्ठ अभियंता यांचे मार्गदर्शनपर व्याख्यानास आता 1 हजार 500 रुपये प्रति तास इतक मानधन दिले जाणार आहे. तसेच पदवी / पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी मानधन 1 हजार प्रति तास अन पदविका अभ्याक्रमांसाठी आता मानधन म्हणून 800 रुपये प्रति तास दिल जाणार आहे.
याशिवाय कला संचालनालया अंतर्गत येणाऱ्या उद्योग व्यवसाय क्षेत्रातून निमंत्रित तज्ज्ञ / अनुभव संपन्न ज्येष्ठ व्यवस्थापक यांचे व्याख्यान मानधन आता 1 हजार 500 प्रति तास राहील. तसेच कला शिक्षण पदविका तसेच पदवी/पदव्युत्तर पदविका / पदव्युत्तर पदवी अभ्याक्रम मानधन आता 1 हजार प्रति तास याप्रमाणे राहणार असल्याची माहिती त्यांनी विधानसभेत दिली आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे निश्चितच राज्यातील तासिका तत्त्वावर कार्यरत असलेल्या प्राध्यापकांना मोठा दिलासा मिळणार आहे. खरं पाहता तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना मानधन वाढ मिळावी अन सोबतच या प्राध्यापकांना मानधन हे तासाच्या (60 min) रूपात मिळते ते तासिका तत्वावर मिळावे अशी देखील मागणी केली जात होती. यापैकी मात्र मानधन वाढीची मागणी मान्य झाली आहे. वास्तविक तासिका ही 45 मिनिटे किंवा 50 मिनिटांची असते मात्र तास हा 60 मिनिटाचा असतो अशा परिस्थितीत यामधील संभ्रम दूर करून तासिका तत्वावर मानधन मिळावं अशी देखील मागणी या प्राध्यापकांची आहे.
हे पण वाचा :- पंजाबराव डख यांच्यावर पैसा घेऊन हवामान अंदाज सांगण्याचा आरोप; महाराष्ट्रात एकच खळबळ, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल