केंद्र सरकारच्या माध्यमातून देशातील नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जात असून या योजनांच्या माध्यमातून अशा नागरिकांचे सामाजिक तसेच आर्थिक दृष्टिकोनातून जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. जर आपण केंद्र सरकारच्या योजना बघितल्या तर यामध्ये देशातील नागरिकांना स्वतःचे पक्के घर असावे या दृष्टिकोनातून प्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात आलेली असून महाराष्ट्र मध्ये देखील ही योजना मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहे.
राज्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन च्या माध्यमातून जवळपास दोन लाख 50 हजार लाभार्थींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका क्लिकवर घरकुलाचा पहिला हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केला जाणार आहे.
तसेच या करिता घरकुल मंजुरी व लाभार्थ्यांची आवश्यक कागदपत्रे गोळा करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर कष्ट घेतलेले आहेत. विशेष म्हणजे लाभार्थ्यांच्या घरोघरी जाऊन कर्मचाऱ्यांनी आवश्यक ती कागदपत्रे जमा करण्याकरिता खूप मोठ्या प्रमाणावर कष्ट घेतलेले आहेत.
राज्यातील घरकुल लाभार्थींना 15 सप्टेंबर म्हणजेच आज मिळणार पहिला हप्ता
याबाबत सविस्तर वृत्त असे की, प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोनच्या माध्यमातून राज्यातील सहा लाख 37 हजार लाभार्थ्यांना घरकुल देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे व त्यानुसार प्रत्येक जिल्हा नुसार उद्दिष्ट पाठवण्यात आलेले आहेत. उद्दिष्टानुसार आता जिल्हा नुसार लाभार्थ्यांची यादी तयार करून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने स्थानिक तालुका स्तरावर लाभार्थींची कागदपत्र गोळा करून त्याला मंजुरी देण्यासाठी सूचना देखील दिलेला आहे.
त्यानुसार आता या योजनेच्या टप्पा दोन अंतर्गत राज्यातील दोन लाख 50 हजार लाभार्थींना पंतप्रधानांच्या एका क्लिकवर घरकुलाचा पहिला हप्ता त्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केला जाणार असून यासाठी लागणारी आवश्यक घरकुल मंजुरी व लाभार्थ्यांचे कागदपत्रे गोळा करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी थेट सणासुदीच्या दिवसांमध्ये देखील लाभार्थ्यांच्या घरी जाऊन कागदपत्रे जमा केले आहेत.
यामध्ये तालुकास्तरीय यंत्रणा व स्थानिक गाव पातळीवर ग्रामसेवकांकडून यादीनुसार घरकुलासाठी नाव असलेल्या लाभार्थींची कागदपत्रे गोळा केली जात आहेत. या कागदपत्रांमध्ये प्रामुख्याने लाभार्थ्यांचे आधार कार्ड तसेच त्यांचे बँक पासबुक, जॉब कार्ड आणि लाभार्थ्यांकडे असलेल्या जागेचा नमुना नंबर आठ इत्यादी कागदपत्रे घेतली जात आहेत.
यामध्ये राज्यात 4 सप्टेंबर रोजी जिल्हा निहाय घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आलेले होते व 15 सप्टेंबर पर्यंत कुठल्याही परिस्थितीत राज्यातील दोन लाख 50 हजार लाभार्थींची कागदपत्रे गोळा करायची होती व घरकुलांना मंजूरी देण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या होत्या.
त्यानुसार 15 सप्टेंबर म्हणजेच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका कार्यक्रमात एका क्लिकवर लाभार्थींच्या बँक खात्यात घरकुलाचा पहिला हप्ता पाठवण्यात येणार आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांमधील सर्वाधिक उद्दिष्टे
या अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यासाठी सर्वाधिक म्हणजेच 52 हजार 358 इतके उद्दिष्ट असून अहमदनगर 21,893, अकोला ११९६९, अमरावती २६,१६६, बीड 22 हजार 75, बुलढाणा 24146, छत्रपती संभाजी नगर 25 हजार 30, धुळे 28 हजार 260, हिंगोली १९२१९, जळगाव 35 हजार 839, जालना 23836, लातूर 15520, नांदेड 52 हजार 996, नंदुरबार 34 हजार 387, नासिक 44,249, परभणी 14991, पुणे 9380, सोलापूर 15,552, ठाणे 7216 अशा प्रकारचे जिल्हानिहाय उद्दिष्ट देण्यात आलेले आहेत.