महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला व या निवडणुकीमध्ये महायुतीला कधी नव्हे इतके घवघवीत यश मिळाले. या मोठ्या यशामागील जर कारणे बघितली तर अनेक राजकीय तज्ञांकडून आणि स्वतः महायुतीच्या माध्यमातून सगळ्यात मोठे कारण हे लाडकी बहीण योजनेचे यश असे सांगितले जात आहे.
एकंदरीत या निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना गेम चेंजर ठरल्याचे एकंदरीत निकालावरून दिसून आले. आपल्याला माहित आहे की, जुलै 2024 मध्ये जेव्हा अर्थमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सादर केली होती व या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याची घोषणा करण्यात आलेली होती व त्यानुसार ही योजना कार्यान्वित होऊन आतापर्यंत महिलांच्या खात्यावर पाच हप्ते म्हणजे साडेसात हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत.
परंतु या निवडणुकीच्या दरम्यान महायुतीच्या माध्यमातून जो काही जाहीरनामा प्रकाशित करण्यात आलेला होता त्यामध्ये जर महायुती पुन्हा सत्तेमध्ये आली तर लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या रकमेत वाढ करत पंधराशे रुपये ऐवजी 2100 रुपये दिले जातील.
आता निवडणुका संपल्या व महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असून लवकरच महायुती सत्तेच्या पटलावर बसणार आहे. परंतु आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार व मिळणार तर १५०० रुपये दिले जाणार की 2000 रुपये असा प्रश्न आता पडलेला आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली ही घोषणा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत दिली जाणारी रक्कम आता एक हजार पाचशे रुपयांवरून 2100 रुपये करणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली असून शिवसेनेच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना त्यांनी म्हटले की, ठरल्याप्रमाणे आता या योजनेचे पैसे पंधराशे रुपये नाहीतर 2100 रुपये करण्यात येतील.
इतकेच नाहीतर मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना राज्यात सुपरहिट झाली असल्याचे देखील त्यांनी म्हटले. शिवसेना( शिंदे गट ) गटनेतेपदी निवड झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पक्षातील महिला कार्यकर्त्या व सामान्य महिलांशी संवाद साधला व यावेळी त्यांनी म्हटले की आता तुम्हाला ठरल्याप्रमाणे 1500 रुपया ऐवजी 2100 रुपये दिले जाणार आहेत
आम्ही त्याचाही निर्णय घेत आहोत. तुम्ही मतदान करताना जो निर्णय घेतला तो अतिशय यशस्वी झाला व आम्हाला खूप मोठा विजय मिळाला आहे. तसेच त्यांनी पुढे म्हटले की,लाडक्या बहिणींनी राज्यात इतिहास घडवला असून मुख्यमंत्री बहीण लाडकी आणि विरोधकांच्या छातीत भरली धडकी अशी काहीशी स्थिती पाहायला मिळत असल्याचे देखील त्यांनी म्हटले.