स्पेशल

ऑक्टोबर महिना म्हणजे स्मार्टफोन चाहत्यांसाठी ठरेल खास! ‘हे’ आहेत 30000 रुपयांच्या आत मिळणारे उत्कृष्ट स्मार्टफोन, वाचा यादी

दिवाळी सण आता अगदी तोंडावर येऊन ठेपला असून या सणाच्या शुभमुहूर्तावर आता ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर वाहनांची आणि इतर काही महत्त्वाच्या वस्तूंची खरेदी केली जाते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या कालावधीमध्ये विविध प्रकारच्या कंपन्यांच्या माध्यमातून आकर्षक ऑफर्स जारी केले जातात व ग्राहकांना आकर्षित करण्याच्या दृष्टिकोनातून खूप मोठे प्रयत्न होत असतात.

तसेच ग्राहकांना विविध प्रकारचे जास्तीचे पर्याय उपलब्ध व्हावे याकरिता अनेक वाहन उत्पादक कंपन्यांकडून वाहने लॉन्च केले जातात व त्यासोबतच स्मार्टफोन उत्पादक कंपन्या देखील या कालावधीत नवनवीन स्मार्टफोन लॉन्च करत असतात.

तसेच ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर देखील वेगळ्या प्रकारच्या महागड्या वस्तूंवर मोठ्या प्रमाणावर डिस्काउंट सेलच्या माध्यमातून दिला जातो.

तुम्हाला देखील या ऑक्टोबर महिन्यात किंवा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बजेट मधील स्मार्टफोन घ्यायचा असेल तर अमेझॉन आणि flipkart वर तीस हजार रुपये किमतीच्या आत मिळणारे उत्तम असे मोबाईलची यादी जाहीर झाली आहे व या यादीतून तुम्ही चांगला स्मार्टफोन घेऊ शकता.

 हे आहेत तीस हजार रुपये आतल्या किमतीचे उत्तम स्मार्टफोन

1- मोटोरोला Edge 50 Pro 5G- हा स्मार्टफोन ऑक्टा कोर प्रोसेसरसह येतो व यामध्ये 2.63 GHz सिंगल कोर, 2.4 GHz ट्राय कोर आणि 1.8 GHz कॉड कोर कॉन्फिगरेशन देण्यात आले आहे.

यामध्ये स्नॅप ड्रॅगन सात जेन तीन चिपसेट देण्यात आल्यामुळे या फोनला जलद कार्यक्षमता मिळते व यामध्ये आठ जीबी रॅम असून 6.7 इंचाचा FHD+P-OLED डिस्प्ले तसेच 144 Hz रिफ्रेश रेट्ससह हा स्मार्टफोन उपलब्ध आहे.

या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सल, तेरा आणि दहा मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरा सेटअप मागच्या बाजूला असून सेल्फीकरिता 50 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये उत्तम बॅटरी बॅकअप करिता 4500 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

2- नथिंग फोन 2a प्लस या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्ससिटी 7350 प्रो चिपसेट देण्यात आला असून त्यासोबत 3GHz ड्युअल कोर आणि 2 GHz हेक्सा कोर कॉन्फिगरेशन असलेला ऑक्टा कोर प्रोसेसर देण्यात आला आहे.

तसेच या स्मार्टफोन मध्ये 6.7 इंचाचा FHD प्लस AMOLED डिस्प्ले देण्यात आला असून जो 120 Hz रिफ्रेश रेट सह मिळतो. तसेच या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे व 50 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. तसेच हा स्मार्टफोन 5000 mAh बॅटरी सह येतो.

3- वनप्लस नॉर्ड 4- या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन सात प्लस Gen तीन चिपसेट देण्यात आला असून यामध्ये 2.8 गीगाहर्ट कॉड कोर आणि त्यासोबत 1.9 GHz ट्राय कोर प्रोसेसर देण्यात आला आहे व यामध्ये 8 जीबी रॅम असून ६.६४ इंचाचा FHD+AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे जो 120 Hz रिफ्रेश रेटसह येतो.

फोनच्या मागच्या बाजूला 50 मेगापिक्सल  आणि त्यासोबत आठ मेगापिक्सलचा कॅमेरा सेटअप दिला आहे व फ्रंटला 16 मेगापिक्सल चा कॅमेरा आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये  5500 mAh ची बॅटरी सुपर VOOC चार्जिंगला सपोर्ट करते.

4- रियलमी जीटी 6T- या स्मार्टफोनमध्ये स्नॅप ड्रॅगन सात प्लस Gen तीन चिपसेट असून यामध्ये 2.8 GHz सिंगल कोर, 2.6 GHz क्वाड कोर आणि 1.9 GHz ट्रायकोअर प्रोसेसर दिला असून यामध्ये आठ जीबी रॅम आणि 6.78 इंचाचा FHD+LTPO AMOLED डिस्प्ले देण्यात आला असून

जो 120 Hz रिफ्रेश रेटसह मिळतो व यामध्ये मागच्या बाजूस 50 मेगापिक्सल + आठ मेगापिक्सल ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला असून फ्रंटला 32 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे व हा फोन 5500 mAh बॅटरी सह येतो.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts