स्पेशल

संकटांना चुटकीसरशी पळवून लावतात ‘या’ राशींचे व्यक्ती अन कुठल्याही गोष्टीत मानत नाहीत हार! तुमची रास आहे का यात?

ज्योतिष शास्त्रानुसार जर बघितले तर बारा राशी असून प्रत्येक राशींच्या व्यक्तींचे स्वभाव गुण तसेच त्यांचे सगळ्या गोष्टी म्हणजेच व्यक्तिमत्वापासून तर त्यांच्या समाजात राहण्याची बोलण्याच्या पद्धतीमध्ये आपल्याला वेगळेपण दिसून येते. आपण जेव्हा समाजामध्ये राहत असतो तेव्हा आपल्याला अनेक वेगळ्या प्रकारचे आणि स्वभावाचे लोक दिसून येतात.

अगदी कामापासून तर बोलण्यापर्यंत अशा अनेक बारीक सारीक गोष्टींमध्ये आपल्याला वेगळेपण दिसते. या सगळ्या स्वभावातील किंवा व्यक्तिमत्त्वातील वेगळेपण हे प्रत्येक राशीनुसार वेगवेगळे असते व प्रत्येक राशीच्या लोकांचा स्वभाव कसा असतो त्याबद्दलचे महत्त्वाची माहिती आपल्याला ज्योतिषशास्त्रामध्ये मिळते.

बारा राशींपैकी काही राशी अशा आहेत त्या राशींचे व्यक्ती हे कितीही संकटे आयुष्यामध्ये आली तरी त्यांना अजिबात घाबरत नाही. त्यांच्याशी दोन हात करत अशा संकटांना ते चुटकीसरशी पळवून लावतात व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये हार मान्य करणे लोकांना आवडत नाही.

कोणत्याही संकटांमध्ये ते बाहेर पडून यशस्वी होतात व आपली ध्येय साध्य करतात. त्यामुळे ज्योतिष शास्त्रानुसार बघितले तर या राशी नेमक्या कोणत्या आहेत? त्याबद्दलची माहिती बघू.

 या राशींचे व्यक्ती कधीही मानत नाहीत हार

1-वृषभ या राशींचे व्यक्ती प्रामुख्याने त्यांच्यात असलेल्या जिद्दीपणा या गुणासाठी प्रामुख्याने ओळखले जातात. या व्यक्तींच्या मनामध्ये जर एखादी गोष्ट असेल व ती जर त्यांना पूर्ण करायची असेल तर ते सातत्याने त्यांचा पाठपुरावा करत राहतात व संकटाचा सामना करत असताना ते धीर सोडत नाहीत. या राशीचे व्यक्तींचे जे काही उद्दिष्ट असते त्याच्यापर्यंत ते एकदम नियोजनबद्ध रीतीने पोहोचतात. तसेच जोपर्यंत ठरवलेले उद्दिष्ट पूर्ण करत नाही तोपर्यंत ते कुठलीही परिस्थितीत हार मानत नाहीत.

2- मकर मकर राशींचे व्यक्तीच्या दृष्टिकोनातून बघितले तर कुठलीही परिस्थिती उद्भवली तरी ते त्यांनी ठरवलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असतात व ते थांबत नाहीत. विशेष म्हणजे या व्यक्तींमध्ये यशस्वी होण्यासाठी लागणारे गुण आणि व्यावहारिक दृष्टिकोन असल्यामुळे ते यशाच्या वाटचालीत अडथळ्यांमध्ये अडकत नाहीत आणि अडकलेत तरी बाहेर पडतात. या राशीच्या व्यक्ती देखील कुठल्याही परिस्थितीत हार मानत नाहीत.

3- मेष मेष राशीवर मंगळ ग्रहाचे राज्य असते आणि हा ग्रह कृती आणि संघर्षाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार बघितले तर मेष राशींच्या व्यक्तींना मंगळ ग्रह नैसर्गिक योद्धा होण्याची मानसिकता प्रदान करतो.

त्यामुळे या राशीचे व्यक्ती अतिशय धाडसी तसेच निडर आणि कोणत्याही परिस्थितीत आव्हानांवर मात करण्याची इच्छाशक्ती यांच्यामध्ये असते. अपयशामुळे या राशीचे व्यक्ती यश मिळवण्यासाठी अधिक दृढनिश्चयी स्वभावाचे होतात आणि स्पर्धात्मक देखील असतात.

4- कुंभ कुंभ राशींची व्यक्ती हे त्यांच्यात असलेल्या कल्पकते करिता प्रामुख्याने प्रसिद्ध असतात. त्यांच्या मनात ध्येय असेल तेव्हा ते पूर्ण करतात आणि त्यांच्या तीव्र इच्छाशक्ती असल्यामुळे कितीही कठीण परिस्थिती उद्भवली तरी चिकाटीने ते त्यामध्ये टिकून राहतात

व ठरवलेले ध्येय पूर्ण करतात. यशाच्या शिखराकडे वाटचाल करत असताना किंवा स्वतःच्या प्रगतीमध्ये जर काही आव्हाने  उभी राहिली तरी त्या आव्हानांचा वापर ते स्वतःसाठी ऊर्जा म्हणून करत असतात. या राशींच्या व्यक्तींना कुठल्याही प्रकारची भीती नसते.

5- सिंह या राशींचे लोकांचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे हे सगळ्यात मोठा विश्वास स्वतःवर अगोदर ठेवतात. किती प्रकारची संकटे आली तरी सिंह राशीचे व्यक्ती अभिमानाने आणि स्वाभिमानाने पुढे जाण्यास प्रवृत्त होतात. तसेच जीवनामध्ये कुठलेही प्रकारचे अडथळे आले तरी त्या अडथळ्यांना त्यांची लवचिकता आणि ताकद दाखवण्याची एक संधी आहे असे ते मानतात व हार मानत नाहीत.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts