स्पेशल

Upcoming SUV Cars : सणासुदीच्या कालावधीत भारतीय कार बाजारपेठेत दाखल होतील या २ कार…

येणारा कालावधी हा सणासुदींचा कालावधी असणार असून या कालावधीमध्ये अनेक जण वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेतात व प्रामुख्याने कार घेण्याचा निर्णय या कालावधीत मोठ्या प्रमाणावर घेतला जातो. अगदी याचप्रमाणे येणाऱ्या या दिवसांमध्ये तुमचा देखील नवीन कार घेण्याचा विचार असेल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे.

आपल्याला माहित आहे की येत्या काही दिवसांमध्ये आता सणांचा कालावधी सुरू होणार आहे. त्यामुळे हा कालावधी ओळखून कार उत्पादक कंपन्यांनी देखील एक मोठी संधी साधून वेगवेगळ्या अशा सेगमेंटमध्ये नवीन कार लॉन्च करण्याची तयारी केलेली आहे

यात बहुप्रतिक्षित  असलेल्या टाटा  Curve EV आणि Citroen Basalt या दोन कार भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्यात आलेले आहेत. येणाऱ्या कालावधीत आणखी 20 वेगवेगळ्या स्टाईल कार लॉन्च होण्याची शक्यता आहे.

परंतु या लेखामध्ये या सणासुदीदरम्यान लॉन्च होणाऱ्या आणि बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षेत असलेल्या दोन लोकप्रिय असलेल्या कारच्या संभाव्य वैशिष्ट्ये आणि किमतींची माहिती घेणार आहोत.

 सणासुदीच्या कालावधीत भारतीय कार बाजारपेठेत दाखल होतील या कार

1- टाटा कर्व टाटा कर्वचा ICE प्रकार येत्या 2 सप्टेंबर रोजी भारतीय ग्राहकांसाठी लॉन्च होणार आहे. जर आपण या कारचे वैशिष्ट्ये पाहिले तर ग्राहकांना या कारमधील तीन इंजिन पर्याय मिळणार आहेत. याशिवाय ग्राहकांना या कारच्या आतील भागात 12.3 इंचाची मोठी टच स्क्रीन देखील दिली जाणार आहे.

तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या कारमध्ये लेवल 2 ADAS तंत्रज्ञान आणि  360 डिग्री कॅमेरा देखील दिला जाणार आहे.

जर आपण मीडिया रिपोर्टनुसार बघितले तर या कारची एक्स शोरूम किंमत सुमारे दहा लाख रुपये असणार आहे. टाटाच्या या कारची स्पर्धा प्रामुख्याने हुंदाई क्रेटा, कीआ सेल्टोस आणि मारुती सुझुकी ग्रँड विटारा सारख्या एसयूव्हीसी असणार आहे.

2- महिंद्रा थार रॉक्स भारतीय कार उत्पादक कंपनी महिंद्राच्या माध्यमातून देखील लोकप्रिय ऑफ रोडींग एसयूव्ही कारची पाच डोअर आवृत्ती लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे.

येणाऱ्या या आगामी पाच डोअर थारचे नवीन नाव महिंद्रा थार रॉक्स ठेवण्यात आले आहे व ती कार साधारणपणे 15 ऑगस्ट रोजी लॉन्च होण्याची शक्यता आहे.

महिंद्राची ही थार रॉक्स बाजारात मारुती सुझुकी जिमनी आणि फोर्स गुरखा या कारशी स्पर्धा करेल. या कारची वैशिष्ट्य पाहिले तर महिंद्रा थार रॉक्स मध्ये 2.0- लिटर टर्बो पेट्रोल इंजन आणि 2.2 लिटर डिझेल इंजन देण्यात आले आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts