Joy Nemo Electric Scooter:- इलेक्ट्रिक वाहनांचा वापर आता भारतामध्ये वाढताना दिसून येत असून यामध्ये इलेक्ट्रिक स्कूटरची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जात असल्याचे चित्र असून त्यासोबतच इलेक्ट्रिक बाइक तसेच इलेक्ट्रिक कार्स देखील ग्राहक आता खरेदी करू लागले आहेत.
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर ही इलेक्ट्रिक वाहने नक्कीच परवडणारी असल्याने आता हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराकडे ट्रेंड वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे अनेक वाहन उत्पादक कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीकडे आता वळले आहेत.
जर आपण इलेक्ट्रिक स्कूटरच्या बाबतीत बघितले तर अनेक कंपन्यांनी उत्कृष्ट अशा इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात लॉन्च केल्या आहेत. या अनुषंगाने जर आपण वार्डविझार्ड इनोव्हेशन अँड मोबिलिटी लिमिटेड कंपनीच्या दृष्टिकोनातून बघितले
तर या कंपनीने भारतीय बाजारात नेमो(Nemo) नावाची एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली असून कंपनीकडून आता या जॉय निमो इलेक्ट्रिक स्कूटरची बुकिंग देखील सुरू करण्यात आली आहे. यास इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल कंपनीचे म्हणणे आहे की, या इलेक्ट्रिक स्कूटरची रनिंग कॉस्ट फक्त 17 पैसे प्रतिकिलोमीटर इतकी आहे.
काय आहेत या इलेक्ट्रिक स्कूटरचे वैशिष्ट्ये?
इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल मिळालेल्या माहितीनुसार जर बघितले तर या इलेक्ट्रिक स्कूटरची रचना प्रामुख्याने शहरी भागातील रस्त्यांच्या दृष्टिकोनातून करण्यात आली आहे. तिची पेलोड क्षमता दीडशे किलो आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कंपनीने इको, स्पोर्ट आणि हायपर असे तीन रायडिंग मोड उपलब्ध करून दिले आहेत.
तसेच या इलेक्ट्रिक स्कूटरच्या BLDC मोटरची क्षमता 1500 वॅट्स आहे आणि ती तीन स्पीड मोटर कंट्रोलरसह येते.या इलेक्ट्रिक स्कूटरचा कमाल वेग 65 किलोमीटर प्रतितास असून कंपनीने ही निमो इलेक्ट्रिक स्कूटर सिल्वर आणि व्हाईट कलरमध्ये ऑफर केली आहे.
एका चार्जमध्ये देते 130 किमीची रेंज
या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये लिथियम आयन बॅटरी पॅक एक एनएमसी युनिट आहे. ज्याला स्मार्ट बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम मिळते. जे बॅटरी पॅकचे आयुष्य आणि कार्यप्रदर्शन वाढवण्यासाठी मदत करते. यामध्ये कंपनीने दावा केला आहे की,72V, 40Ah बॅटरी पॅकची रेंज एका चार्जवर 130 किलोमीटर असेल व ही रेंज इको रायडिंग मोडमध्ये उपलब्ध असेल.
यासोबतच या जॉय निमो इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागच्या बाजूला ड्युअल शॉक अब्सोर्बर देण्यात आले आहे व त्याच वेळी जर आपण ब्रेकिंग सिस्टम बघितली तर यामध्ये ड्युअल हायड्रोलिक डिस्क ब्रेक देण्यात आले आहे. तसेच यात कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम देखील आहे.
काय आहेत इतर वैशिष्ट्ये?
कंपनीच्या दाव्यानुसार या इलेक्ट्रिक स्कूटरची धावण्याची किंमत फक्त 17 पैसे प्रति किलोमीटर असून या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये एलईडी युनिटसह प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि पाच इंच फुल कलर टीएफटी डिस्प्ले देण्यात आला आहे.
तसेच यामध्ये रिमोट मॉनिटरिंग, रियल टाईम ट्रेकिंग आणि क्लाऊड कनेक्ट इन साईटसाठी मोबाईल ॲप्स सह एकत्रित केलेली स्मार्ट कॅन सपोर्ट बॅटरी सिस्टम देण्यात आली आहे. तसेच मोबाईल चार्जिंग करिता यूएसबी पोर्ट देखील आहे. तसेच पार्किंग मधून वाहनधारकाला ही स्कूटर व्यवस्थित काढता यावी याकरिता मदत म्हणून रिव्हर्स असिस्ट देखील देण्यात आला आहे.
किती आहे जॉय नेमो या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत?
वार्डविझार्ड इनोव्हेशन अँड मोबिलिटी लिमिटेड या कंपनीने भारतीय बाजारपेठेत जॉय नेमो नावाची इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली व या स्कूटरची प्रास्ताविक किंमत 99 हजार रुपये एक्स शोरूम इतकी ठेवण्यात आली आहे.