स्पेशल

Turmeric Crop: ‘हा’ शेतकरी फक्त 25 गुंठ्यात करतो हळदीची लागवड आणि मिळवतो 5 ते 6 लाखांचे उत्पन्न! कसे आहे हळद लागवडीचे नियोजन?

Turmeric Crop:- तुमच्याकडे शेती किती आहे? याला महत्व नसून आहे त्या क्षेत्रामध्ये किंवा शेतीमध्ये पिकांचे नियोजन आणि व्यवस्थापन कसे करतात? याला खूप महत्त्व असते. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि परंपरागत पिकांऐवजी भाजीपाला आणि फळ पिकांच्या लागवडीतून कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील शेतकऱ्यांनी आता भरघोस उत्पादन मिळवण्यामध्ये यश संपादन केले आहे.

असे अनेक उदाहरणे आपल्याला दिसून येतील की कमीत कमी शेतीत देखील लाखो रुपयांचे उत्पन्न शेतकरी मिळवतात.यासाठी फक्त योग्य पिक नियोजन तसेच व्यवस्थापनाच्या पद्धती व नेमकेपणाने केलेला तंत्रज्ञानाचा वापर खूप फायदेशीर ठरताना दिसून येत आहे.

अगदी याचप्रमाणे जर आपण बीड जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी विजय शिंदे यांचे उदाहरण घेतले तर हा मुद्दा आपल्या लक्षात येईल.विजय शिंदे हे 25 गुंठ्यात हळद लागवड करून त्यातून लाखोंचे उत्पन्न मिळवतात व वर्षाकाठी हळदी सोबतच फुल पिकांच्या उत्पादनातून देखील चांगले आर्थिक उत्पन्न मिळवत आहेत.

बाजारपेठेचा अभ्यास करून ते हळद पिकाचे नियोजन करतात.आपल्याला माहित आहे की, मागच्या वर्षापासून बाजारपेठेमध्ये हळदीला चांगले दर मिळत असल्याचे पाहून 25 गुंठ्यात विजय शिंदे यांनी हळदीची लागवड करून उत्पादन घेतले व हळदीची शेती यशस्वी करून भरघोस उत्पादन मिळवले.

 विजय शिंदेंचे आहे पाच वर्षापासून हळद लागवडीत सातत्य

बीड जिल्ह्यातील होळ या गावचे विजय शिंदे हे प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. गेल्या चार ते पाच वर्षापासून त्यांनी हळद लागवडीत सातत्य ठेवले असून फक्त 25 गुंठे ते हळद लागवड करतात व त्या पिकातून वर्षाला पाच ते सहा लाखांचे उत्पन्न मिळवतात.

विशेष म्हणजे हळद पिकामध्ये त्यांनी मुग पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करून कमी क्षेत्रामध्ये जास्तीचे उत्पन्न कसे मिळेल यासाठी प्रयत्न केल्याचे आपल्याला दिसून येते.हळदीची लागवड तर थेट बाजारपेठेपर्यंत विक्री या टप्प्यामध्ये विशेष व्यवस्थापन त्यांच्या माध्यमातून केले जाते.

पाणी व्यवस्थापनाचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याने हळद पिकासाठी ते पाणी व्यवस्थापनावर व्यवस्थित भर देतात व त्याचा फायदा हळद उत्पादन वाढीवर होतो. साधारणपणे सगळ्या नियोजनातून 25 गुंठे क्षेत्रात पाच ते सहा लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न ते मिळवतात.

 आधुनिक तंत्रज्ञानामुळे होते शक्य

उच्च शिक्षण घेऊन नोकरी न करता शेतीमध्ये व्यवस्थित लक्ष देऊन पिकांमध्ये सातत्य ठेवत हळदीचे चांगले उत्पादन विजय शिंदे यांनी घेतले. यामध्ये त्यांना तंत्रज्ञानाचा खूप मोठा फायदा झाला.

हळद पिकाच्या व्यवस्थापनामध्ये आवश्यक त्या तंत्रज्ञानाचा वापर करून चांगले उत्पादन मिळवलेच व त्यासोबत वेगवेगळ्या पिकांच्यामध्ये देखील तंत्रज्ञानाचा वापर करून ते भरघोस उत्पादन मिळवतात. त्यामुळे त्यांना कमीत कमी क्षेत्रात देखील लाखो रुपये मिळवणे शक्य झाले.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts