Farmer Success Story :- राज्यातील शेतकरी आता मोठ्या प्रमाणावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करू लागले असून नव्याने मोठ्या प्रमाणावर शेतीकडे वळलेला तरुण वर्ग आधुनिक तंत्रज्ञानासोबत वेगवेगळ्या पिकांची लागवड करून लाखोत नफा मिळवताना आपल्याला दिसून येत आहेत.
यामध्ये पारंपरिक पिकांना फाटा देत आधुनिक पद्धतीची पीक पद्धती व भाजीपाला पिके तसेच मोठ्या प्रमाणावर फळबाग लागवडीकडे नव्याने आलेले हे उच्चशिक्षित तरुण वळताना आपल्याला दिसून येत आहेत. या माध्यमातून कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील व्यवस्थापनाच्या जोरावर भरघोस असे उत्पादन मिळवत आहेत.
अगदी याच मुद्द्याला तरुण जर सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील वाशिंबे या गावचे अभिजीत पाटील या उच्चशिक्षित असलेल्या तरुणाचा विचार केला तर अभियांत्रिकी पर्यंत शिक्षण पूर्ण करून त्यांनी शेती करण्याचा विचार केला व अमेरिकेतील फ्लोरिडा प्रांतामध्ये पिकवल्या जाणाऱ्या ब्लू जावा या केळीच्या वाणाची माहिती मिळवली व यासोबत अभिजीत पाटील यांचा शेतीचा प्रवास सुरू झाला.
अभिजीत पाटील यांनी केली ब्लू जावा या विदेशी केळीच्या वाणाची लागवड
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्याच्या वाशिंबे या गावचे रहिवासी असलेल्या अभिषेक पाटील हे उच्च शिक्षित असून त्यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केलेले आहे. परंतु नोकरी न करता अमेरिकेतील त्यांच्या एका मित्राच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी शेतीमध्ये केळीची लागवड करण्याचा निश्चय केला व याकरिता अमेरिकेतील फ्लोरीडा प्रांतामध्ये पिकवल्या जाणाऱ्या ब्लू जावा या केळीच्या वाणाची माहिती मिळवली.
त्यानंतर पुणे येथील एका प्रसिद्ध खाजगी रोपवाटिकेच्या माध्यमातून त्यांनी अमेरिकेतून केळीच्या ब्लू जावा या वाणाची केळीची रोपे मागवली व त्याची लागवड केली. त्यानंतर या रोपांची लागवड त्यांनी दोन एकर क्षेत्रामध्ये केली. उच्च व्यवस्थापन आणि अफाट मेहनत घेऊन त्यांची केळीची बाग आज काढणीला आली असून येणाऱ्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये संपूर्ण केळीची काढणी पूर्ण होणार असल्याचे देखील अभिजीत पाटील यांनी म्हटले. सध्या या वाणाच्या केळी घडांच्या संख्येचा विचार केला तर दोन एकर मध्ये 35 ते 40 टन केळीचे उत्पादन मिळेल अशी अपेक्षा त्यांना आहे.
दोन एकर साठी किती आला खर्च?
त्यांची केळीची काढणी सुरू झाल्यानंतर त्यातील काही केळी पुणे येथील बाजार समितीमध्ये पाठवली व ब्लू जावा केळीला प्रति किलो करिता 90 रुपयाचा दर मिळाला व या उत्पादना मधून त्यांना 30 ते 35 लाख रुपये आर्थिक उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे. या दोन एकर केळीसाठी त्यांना एकूण अडीच लाख रुपयांचा खर्च आल्याचे देखील त्यांनी म्हटले.
काय आहेत ब्लू जावा केळी वाणाची वैशिष्ट्ये?
हे एक अमेरिकी केळी वाण असून त्याचे फळ मध्यम आकाराचे येते व एका घडामध्ये दहा ते बारा केळीच्या फण्या येतात. हे विदेशी केळीचे वाण इतर स्थानिक वाणांप्रमाणेच दहा महिन्यांमध्ये काढणीला येते. ब्लू जावा केळीचा गर मलाई सारखा असतो व चव आईस्क्रीम सारखी असतो. म्हणूनच केळीच्या या वाणाला आईस्क्रीम केळी असे देखील म्हणतात.