DA Hike:- केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांमध्ये महत्वाचा असलेला महागाई भत्तावाढी संदर्भातली एक महत्त्वाचे अपडेट समोर येत असून आपल्याला माहित आहेस की नवीन महागाई भत्ता हा एक जुलै 2023 पासून लागू होणार आहे परंतु त्याची घोषणा मात्र सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात होऊ शकते अशी शक्यता आहे.
तसे पाहायला गेले तर सरकार महागाई भत्त्यामध्ये एका वर्षामध्ये दोनदा वाढ करत असते. यामध्ये जानेवारी व जुलै महिन्यात सरकारकडून सुधारणा केली जाते. सध्या कर्मचाऱ्यांना सरकारकडून 42 टक्के इतका महागाई भत्ता मिळत आहे. परंतु जूनच्या एआयसीपीआय निर्देशांकावरून स्पष्ट होईल की सरकार पुढील डीए मध्ये किती वाढ करणार आहे.
या तारखेपासून लागू होऊ शकते महागाई भत्तातील वाढ
जुलै महिन्यात सरकारने जर महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांनी वाढ केली तर कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यात 42 टक्क्यांवरून 46 टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहे. म्हणजेच एक जुलैपासून कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्के होणार आहे. याच आधारावर केंद्र सरकार डिसेंबर 2023 पर्यंत महागाई भत्त्यातील वाढ देणार आहे.
त्यानंतर एक जानेवारी 2024 नंतर महागाई भत्त्यातील पुढील वाढ दिली जाण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर एक जानेवारीचा महागाई भत्ता देखील मार्च 2024 मध्ये जाहीर होण्याची अपेक्षा आहे. जर पुढच्या वर्षातील एक जानेवारी 2024 मध्ये जर महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ केली तर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 50 टक्के होईल.
महागाई भत्त्यात चांगली वाढ होण्याची अपेक्षा
या आधी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ केलेली होती. नंतर महागाई भत्ता 42 टक्क्यांवर पोहोचला होता. करण्यात आलेली ही वाढ 1 जानेवारी 2023 पासून लागू करण्यात आलेली होती. पुढील महागाई भत्त्यातील वाढ या महिन्यापासून जाहीर केली जाण्याची शक्यता असून जी वाढ चार टक्के इतकी अपेक्षित आहे.
जर आपण महागाई भत्त्याचा नियम पाहिला तर जेव्हा डीए 50 टक्क्यांवर असतो तेव्हा तो शून्यावर येतो. याआधी आपण विचार केला तर 2016 मध्ये जेव्हा सरकारने सातवा वेतन आयोग लागू केला होता तेव्हा महागाई भत्ता शून्यावर आणला होता. जर आपण याबाबतचा नियम पाहिला तर महागाई भत्ता 50 वर पोहोचला की त्याला शून्यावर आणले जाते.
तसेच ज्या कर्मचाऱ्यांना 50 टक्क्यानुसार महागाई भत्ता मिळतो त्यांच्या मूळ वेतनात म्हणजेच किमान वेतनात जोडला जातो. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनामध्ये नऊ हजार रुपयांची वाढ होऊ शकते. उदाहरणच घ्यायचे झाले तर एखाद्या कर्मचाऱ्यांचे वेतन जर अठरा हजार रुपये प्रति महिना असेल तर अशा कर्मचाऱ्याला 50 टक्के महागाई भत्ता पैकी नऊ हजार रुपये मिळतील. म्हणजेच डीए 50 टक्के झाल्यानंतर तो शून्यावर आणला जातो आणि मूळ पगारात जोडला जाईल.