सध्या तंत्रज्ञानाचा वापर आणि व्यक्तीच्या अंगात असलेले कौशल्य इत्यादींमुळे अनेक उपयोगी आणि कठीण वाटणाऱ्या बाबी देखील साध्य होताना दिसून येत आहे. सध्या डोक्याचा वापर करून बनवलेले जुगाड यंत्रे कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या माध्यमातून विकसित करण्यात येत असून शेतकऱ्यांना शेती करण्याच्या दृष्टिकोनातून ते खूपच फायद्याचे आहेत. यामध्ये फवारणी करण्याचे यंत्र असो किंवा कोळपणी करण्याचे यंत्र अशा बऱ्याच प्रकारांमध्ये अनेक शेतकऱ्यांनी जुगाड करून यंत्र बनवलेले आहेत.
तसेच अशा जुगाड यंत्रांमध्ये घरगुती टाकाऊ वस्तूंचा वापर मोठ्या प्रमाणावर केला गेल्यामुळे अशा यंत्राच्या किमती देखील कमीत कमी असून त्यांचे उपयोगिता मात्र वाखाणण्याजोगे आहे. अगदी याच पद्धतीने आपण विहिरीवरील पंपाचा विचार केला तर तो विजेवर चालतो. परंतु बऱ्याचदा विजेच्या समस्यांनी शेतकऱ्यांना खूप त्रस्त करून सोडलेले आहे.
विहिरीमध्ये पाणी असते परंतु वीज नसल्यामुळे पाणी असून पिकांना देता येत नाही. परंतु आता या समस्येवर एका शेतकऱ्याने भन्नाट जुगाड तयार केला असून विजय शिवाय चालणाऱ्या पंपाचा जुगाड आता सगळीकडे चर्चेचा विषय बनला आहे. महत्वाचे म्हणजे या जुगाडाचा एक व्हिडिओ एका सरकारी अधिकाऱ्याने त्यांच्या ट्विटर अकाउंट वरून शेअर देखील केला आहे.
कशा स्वरूपाचा आहे हा जुगाड?
याबाबत सविस्तर वृत्त असे की, एका शेतकऱ्याने डोकं लावून विजेशिवाय चालणारा पंप तयार केला असून या पंपाला विजेची गरज नाही. जर आपण या जुगाड केलेल्या पंपाचे स्वरूप पाहिले तर या पंपाच्या बाजूला जमीन खोदून त्यामध्ये नळ जोडला असून एका बोर्डाला लहान लहान बल्ब लावलेले आहेत. याला एक चाक कनेक्ट केलेले असून हे चाक फिरवताच त्या नळातून पाणी येते.
सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून शेतकऱ्याने बनवलेल्या या जुगाडपंपामुळे वेळ देखील वाचणार आहे व विजेची देखील बचत होणार आहे. तसेच तुम्ही कोणत्याही वेळी पंप चालू करून पिकांना पाणी देऊ शकणार आहात. एका आयआरएस अधिकाऱ्याने हा ट्विटर अकाउंट वर व्हिडिओ पोस्ट केला असून दहा एचपी चा पंप विजेशिवाय चालतो असे कॅप्शन त्यांनी त्या व्हिडिओला दिलेले आहे.
हा जुगाड पाहण्यासाठी व्हिडिओ पहा