स्पेशल

असे जुगाड फक्त भारतीयच करू शकतात! चक्क जुगाड करून ट्रॅक्टरलाच बनवून टाकले बस, पहा व्हिडिओ

जुगाड या शब्दाचा अर्थ जर आपण पाहिला किंवा आपण ज्या अर्थाने या शब्दाचा अर्थ लावतो तो म्हणजे एखादी गोष्ट बनवण्यासाठी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या वस्तूंचा वापर करून एखादे काम करण्यासाठी एखादी गोष्ट विकसित करणे किंवा आहे त्या गोष्टीमध्ये काही बदल करून दुसऱ्याच कामाकरिता ती गोष्ट वापरणे याला आपण जुगाड म्हणू शकतो.

भारताचा विचार केला तर प्रत्येक क्षेत्रात असे अनेक जुगाड तयार केले जातात. जुगाडांची खरी निर्मिती पाहायची असेल तर भारतातील कृषी क्षेत्रामध्ये खूप प्रकारचे जुगाड यंत्र आपल्याला दिसून येतात. यामध्ये पिकांना फवारणी करणारे यंत्रांपासून ते आंतरमशागतीसाठी लागणारे यंत्र देखील जुगाड करून बनवले गेले आहेत.

कारण भारतामध्ये असे जुगाड करणाऱ्या इंजिनिअरची कमी नाही असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कधी कधी असे जुगाड बनवले जातात किंवा असे जुगाड शोधून काढले जातात ते पाहून आपल्याला अचंबित होतं. सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत असून यामध्ये समोरचे वाहन नेमके ट्रॅक्टर आहे की बस आहे हे देखील लवकर कळत नाही.

 या जुगाडमध्ये ट्रॅक्टर पासून तयार केली बस

ट्रॅक्टर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि ट्रॅक्टर मध्ये जर प्रवासी बसण्याची किंवा माणसं बसण्याची क्षमता पाहिली तर ती ड्रायव्हर सोडून दोन किंवा तीन व्यक्ती जास्तीत जास्त बसू शकतात. कारण ट्रॅक्टरचा वापर हा प्रवासी वाहतुकीसाठी नसून तो शेती कामाकरिता आणि इतर अवजड काम करिता प्रामुख्याने केला जातो.

परंतु एका भारतीय इंजिनीयरने मात्र यामध्ये कमालच केली असून त्याने बसचे इंजिन काढून उरलेला भाग ट्रॅक्टरला जोडून बसच्या आकाराचा  ट्रॅक्टर केला आहे की ट्रॅक्टरच्या आकाराची बस तयार केली आहे हे समजत नाही. या जुगाडी बसच्या माध्यमातून तब्बल 25 ते 30 माणसं सहज प्रवास करू शकतील एवढी क्षमता त्याची आहे. याचा व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून नेटीझन्सकडून देखील या जुगाडाचे कौतुक केले जात आहे.

 जुगाड पाहण्यासाठी पहा व्हिडिओ

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts