स्पेशल

उन्हाळ्यामध्ये साप निघण्याच्या प्रमाणात होते वाढ! वापराल ‘या’ टिप्स तर साप घरात तर सोडाच परंतु अंगणात देखील नाही दिसणार

साप हे नाव जरी ऐकले तरी बऱ्याच जणांच्या अंगावर काटा उभा राहतो. त्यातल्या त्यात जर एखाद्या वेळेस साप समोर दिसला तर व्यक्तीची भीतीने त्रेधातिरपीट उडते. कारण सापाबद्दल व्यक्तीच्या मनात भीती असते की साप चावला किंवा सर्पदंश झाला की व्यक्ती मरतो.

परंतु आपल्याला माहित असेलच की, जगाच्या पाठीवर किंवा भारतामध्ये जेवढ्या सापाच्या प्रजाती आपल्याला दिसून येतात त्यापैकी काही मोजक्या जाती या विषारी असतात.बहुसंख्य जाती या बिनविषारी आहेत. परंतु तरीदेखील सापांच्या बाबतीत आपण सावध राहणे देखील तितकेच गरजेचे असते.

जर आपण सध्याचा उन्हाळ्याचा कालावधी बघितला तर सगळीकडे प्रचंड प्रमाणात उष्णता जाणवते व अशी उष्णता ही सापांच्या बिळांमध्ये देखील जाणवत असल्याने थंडाव्यासाठी बऱ्याचदा बिळांच्या बाहेर येतात व घरामध्ये देखील शिरतात. त्यामुळे या दिवसांमध्ये खूप काळजी घेणे गरजेचे आहे.

याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून एका प्लेटफॉर्मवर वापरकर्त्यांनी प्रश्न विचारला होता की साप कुणाला घाबरतो व या प्रश्नाला अनेक युजर्सनी उत्तरे दिलेली आहेत. त्यामध्ये एका युजर्सने उत्तर देताना म्हटले आहे की साप एका विशिष्ट वासाला देखील घाबरतो. त्यानुसार आपण नेमका तो वास कोणता आहे किंवा कोणत्या वासाला साप घाबरतो? याबद्दलची माहिती घेऊ.

 हे वास सापाला आवडत नाही?

1- रॉकेलचा वास सापाला प्रत्येक व्यक्ती घाबरत असते.परंतु साप हे काही विशिष्ट वासांना घाबरतात. यातील केरोसीन म्हणजेच रॉकेल याचा वास सापाला सहन होत नाही. सापाच्या उग्र वासामुळे साप घरातून पळ काढतो किंवा ज्या ठिकाणी रॉकेलचा वास येतो त्या ठिकाणी साप थांबत नाही.

2- लसूण

कांदा जर आपण ॲनिमल वेबसाईट इज ऍनिमलमध्ये दिलेल्या माहितीनुसार पाहिले तर त्यामध्ये सांगितल्यानुसार साप हा लसूण आणि कांद्याच्या वासाला देखील घाबरतो.

3- अमोनिया गॅस अमोनिया गॅसचा वास सापाला अजिबात सहन होत नाही. त्यामुळे या गॅसचा काही वेळपर्यंत धुर केला तर साप पळून जाण्यास मदत होते. अमोनिया गॅसच्या वासामुळे साप लवकर पळून लावणे सोपे होते.

4- काही मसाल्याच्या पदार्थांचे वास बऱ्याचदा साप हे मसाल्याच्या वासाला देखील घाबरतात. यामध्ये दालचिनी, लवंग, लिंबू आणि व्हिनेगर या साहित्याचे वा पदार्थांचे उग्र वास सापाला सहन होत नाही व साप दिसल्यावर जर या वस्तूंचा वापर केला तर साप पळून जातो.

5- तुळस पुदिना ग्रामीण भागामध्ये प्रत्येकाच्या घरासमोर तुळस आपल्याला दिसून येते. तसेच बऱ्याच जणांच्या बाल्कनीमध्ये पुदिनाचे रोपटे देखील आपल्याला दिसून येते. परंतु तुळस आणि पुदिन्याचा वास देखील सापाला अजिबात सहन होत नसल्यामुळे या दोन वनस्पती जर बाल्कनीमध्ये असतील तर साप घराच्या आसपास देखील फिरत नाही.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts