स्पेशल

घरामध्ये मुंग्या आणि माशांचे प्रमाण वाढले? करा हे उपाय आणि पळवा मुंग्या आणि माशांना

घरामध्ये बऱ्याचदा आपण पाहतो की, लाल मुंग्या तसेच माशांचा वावर मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. घरामध्ये जास्त करून किचन चा विचार केला तर या ठिकाणी अन्नाचे थोडे जरी कण खाली पडले तरी त्या कणांना मुंग्या चिकटतात आणि माशा देखील त्या ठिकाणी दिसून येतात. तसेच एखाद्या गोड पदार्थाचा डबा तुम्ही कोणत्याही ठिकाणी ठेवला तरी त्याचा शोध मुंग्या बरोबर लावतात व या पदार्थांमध्ये देखील त्यांचा सुळसुळाट होतो.

त्यामुळे खूप त्रासाला सामोरे जावे लागते. तसेच घरामध्ये माशांचा वावर हा आरोग्याच्या

दृष्टिकोनातून देखील नुकसानकारक आहे. घरामध्ये स्वयंपाक घरच नाही तर कुठेही कोपऱ्यामध्ये तुम्हाला मुंग्या आणि माशा दिसून येतात. या करिता काही रासायनिक स्प्रे किंवा मुंग्यांच्या नियंत्रणाकरिता खडू सुद्धा मिळतात.

परंतु बऱ्याचदा यांचा काही उपयोग होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर जर आपण काही घरगुती उपाय करून पाहिले तर नक्कीच मुंग्या आणि माशांपासून मुक्तता मिळू शकते. त्यामुळे या लेखात आपण काही सोपे उपाय योजना पाहणार आहोत ज्यामुळे मुंग्या आणि माशांपासून मुक्तता मिळू शकते.

 हे उपाय करा आणि मुंग्या माशांना दूर पळवा

1- लिंबू लिंबूचा वापर करून उरलेली साल आणि लिंबू यांच्या साह्याने तुम्ही घरातील मुंग्यांना बाहेर घालवू शकतात. यासाठी फक्त जेव्हा तुम्ही घरातील फरशी पुसाल तेव्हा पाण्यामध्ये लिंबाचा रस पिळून मिक्स करून घ्यावा. जेव्हा लिंबाचा वास येतो त्यामुळे मुंग्या दूर राहतात. यासोबतच जर तुम्ही लिंबाची साले घराच्या कुठल्याही कोपरामध्ये ठेवली तरी वासाने मुंग्या जवळ येत नाहीत.

2- मीठ घरामध्ये जर एखाद्या ठिकाणी जास्त प्रमाणात मुंग्या दिसून येत असतील तर अशा ठिकाणी तुम्ही मीठ किंवा मिठाचे पाणी शिंपडले तरी फायदा होतो. याकरिता तुम्ही पाण्यामध्ये मीठ उकळवून घ्यावे व ते द्रावण बाटलीमध्ये भरून त्याचा स्प्रे करू शकतात.

3- काळी मिरी मुंग्यांची साधारणपणे प्रवृत्ती आपल्याला माहिती आहे की गोड पदार्थांच्या भोवती किंवा गोड पदार्थांना मुंग्या जास्त प्रमाणात लागतात. त्यामुळे जर गोड पदार्थाचा डब्बा किंवा गोड पदार्थ घरामध्ये तुम्ही कुठल्याही जागेवर ठेवला असेल तर त्या ठिकाणी मुंग्या हमखास येतात. त्यामुळे जर तुम्ही साखरेच्या डब्यामध्ये काळीमिरी ठेवली किंवा याव्यतिरिक्त घराच्या कोणत्या ठिकाणी मुंग्या जास्त येतात त्या ठिकाणी जर तुम्ही काळी मिरीची पूड शिंपडली तरी मुंग्या येत नाहीत.

4- व्हाईट व्हिनेगर एका स्प्रे बॉटलमध्ये वाईट व्हिनेगार भरून ठेवावा व त्यामध्ये पाणी घालून व्यवस्थित मिश्रण करून घ्यावे. घरामध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला मुंग्यांचे प्रमाण जास्त दिसेल किंवा मुंग्या दिसून येतील अशा ठिकाणी हा व्हाईट व्हिनेगर फवारावा. या व्हिनेगरच्या वासाने मुंग्या दूर पळतात.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts