स्पेशल

पुरणपोळी विकून ‘हा’ व्यक्ती महिन्याला करतो कोट्यावधींची कमाई! आज आहे 17 आउटलेटचा मालक

एखादी व्यक्ती आयुष्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये कष्ट करतात व पर्यायाने कष्टाच्या जीवावर उच्च अशा यशाला गवसणी घालतात. या सगळ्या यशामागे व्यक्तीत असलेली प्रचंड कष्ट करण्याची ताकद, आपण जे काही ठरवलेले आहेत ते मिळवण्यासाठी कुठल्याही परिस्थितीशी दोन हात करून त्यातून मार्ग काढत त्याच मार्गावर अविरतपणे चालण्याची क्षमता आणि जोपर्यंत ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत न थांबता कष्ट आणि जिद्द हे गुण प्रामुख्याने महत्त्वाचे असतात.

बऱ्याचदा यशामागे व्यक्तीची एखादी छोटीशी कल्पना देखील खूप महत्त्वाची ठरते व ही छोटीशी कल्पनाच व्यक्तीला आयुष्यात यशस्वी करून जाते.

अगदी हाच मुद्दा जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर कर्नाटकच्या केआर भास्कर याच्या उदाहरणावरून समजून घेता येईल. अतिशय कष्टाचे जीवन जगणाऱ्या या व्यक्तीने स्वतःचा भास्करचे पुरणपोळी घर हा ब्रँड निर्माण केला व पुरणपोळी विकून हा व्यक्ती दर महिन्याला कोट्यवधी रुपयांची कमाई सध्या करत आहे.

 पुरणपोळी विकून हा व्यक्ती महिन्याला कमवतो कोट्यावधी रुपये

केआर भास्कर हे मूळचे कर्नाटक राज्याचे रहिवासी असून जेव्हा त्यांचे वय बारा वर्षे होते तेव्हा ते बेंगलोर मधील एक हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करायला लागले. उदरनिर्वाहासाठी आणि घरच्यांना आर्थिक मदत व्हावी या दृष्टिकोनातून त्यांनी हे काम स्वीकारले.

वयाच्या बारा वर्षापासून सुरू केलेले हॉटेलमधील वेटरचे काम त्यांनी पाच वर्षे केले. परंतु हे काम केल्याने आपल्या आयुष्यात कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही हे त्यांना माहिती होते. त्यानंतर मात्र हॉटेलमधील वेटरचे काम त्यांनी सोडले व आठ वर्षे ते नृत्य ट्रेनर म्हणून काम करत राहिले.

नंतर पानाचे दुकान देखील उघडले. परंतु या सगळ्या व्यवसायांच्या माध्यमातून त्यांना फारसे काही आर्थिक उत्पन्न मिळत नव्हते व पाहिलेले स्वप्न मात्र मोठे होते.

 अशाप्रकारे केली पुरणपोळी विकायला सुरुवात

त्यानंतर वयाच्या 23 व्या वर्षी त्यांना एक आयडिया सुचली व त्यांनी पुरणपोळी बनवून ती विक्री करण्याचे ठरवले. त्यानंतर त्यांनी मुंबईच्या रस्त्यांवर सायकलवर फिरुन पुरणपोळी विक्री सुरू केली. परंतु या ठिकाणाहूनच त्यांच्या नशिबाने टर्निंग पॉईंट घेतला. पुढे चालून एका कुकिंग शोमध्ये त्यांची निवड झाली व त्यांना या व्यवसायामध्ये चांगली ओळख मिळाली व त्यांचा ब्रँड हळूहळू विकसित झाला.

आज जर आपण केअर भास्कर यांची व्यवसायाची स्थिती बघितली तर सध्या दर आठ महिन्यांनी देशात एक नवीन आउटलेट ते उघडतात व एकट्या कर्नाटक राज्यांमध्ये त्यांचे 17 स्टोअर्स असून दहापेक्षा जास्त फ्रेंचायसी आहेत. या व्यवसायामध्ये त्यांनी स्वतःचा भास्करची पुरणपोळी घर हा ब्रँड विकसित केला असून त्याचे ते आज मालक आहेत.

जर आपण त्यांच्या या कर्नाटक मधील जे काही स्टोअर्स आणि फ्रेंचाईसी  आहे त्यांची दर महिन्याची कमाई पाहिली तर ती 18 कोटी रुपयांच्या घरामध्ये आहे व या व्यवसायातून ते  3.6 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवत आहेत.

के आर भास्कर यांच्या उदाहरणावरून आपल्याला दिसून येते की,व्यक्तीच्या मनामध्ये काहीतरी मोठे करण्याची जिद्द राहिली व ती पूर्ण करण्यासाठी कठोर कष्ट घेण्याची क्षमता आणि इच्छा राहिली तर व्यक्ती कुठल्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकतो हे दिसून येते.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts