स्पेशल

ही लोकप्रिय मालिका आता दूरदर्शनवर ! उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली घोषणा…

Swarajyrakshak Sambhaji :- झी मराठीवर गाजलेली आणि लॉकडाऊनच्या काळात पुन्हा प्रसारित करण्यात आलेली ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका आता दूरदर्शनवरून (प्रसार भारतीची सह्याद्री वाहिनी) प्रसारित करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंबंधीची घोषणा केली.

या निर्णयाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी स्वागत केले आहे. या मालिकेमुळे नवीन पिढीला छत्रपती संभाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास समजण्यास मोठी मदत होईल, असे पवार यांनी म्हटले आहे.

छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवन कार्यावरील या मालिकेत राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. झी मराठीवरील ही मालिका त्यावेळी खूप लोकप्रिय झाली.

करोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात इतर मालिकांचे चित्रिकरण बंद होते. त्यामुळे ही मालिका पुन्हा प्ररसारित करण्यात आली होती.

आता हीच मालिका दूरदर्शनवरून प्रसारित करण्याची घोषणा पवार यांनी केली आहे. ही मालिका केव्हापासून आणि कोणत्या वेळेत सुरू होणार, यासंबंधीचा अधिक तपशील अद्याप उपलब्ध झाला नाही.

सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचीही घोषणा करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात वढू बुद्रुक येथे सुमारे २५० कोटी रुपये खर्चून हे स्मारक उभारण्यात येणार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts